सामान्यांच्या खिशाला फटका! भारतात पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

सामान्यांच्या खिशाला फटका! भारतात पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी संघटना OPEC ची 4 जून रोजी महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालांनुसार या बैठकीमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये झालेली कपात यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी संघटना OPEC (Organization of the Petroleum Exporting Countries) ची 4 जून रोजी महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालांनुसार या बैठकीमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये झालेली कपात (Crude Oil Production Cut) यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारबरोबरच सामान्य नागरिकांच्या खिशावरही मोठा परिणाम होऊ शकतो. भारतात आवश्यक गरजांसाठी 83 टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते आणि याकरता वार्षिक 100 अब्ज डॉलर मोजावे लागतात. रुपयाचे कमजोर असणार मूल्य या रकमेमध्ये आणखी वाढ करतं आणि सरकार याची भरपाई करण्यासाठी अधिक टॅक्स आकारते.

(हे वाचा-600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू)

ओपेक आणि सहकारी देश 4 जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणाऱ्या बैठकीमध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 97 लाख बॅरलने कमी करण्याचा विचार होऊ शकतो. जगभरात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या 10 टक्के हे उत्पादन आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

गेल्या 4 आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत दुप्पट झाली आहे. ओपेक आणि सहयोगी देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात जारी ठेवली आहे. त्यामुळ कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती आता देखील 40 टक्के कमीच आहेत.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी! एप्रिलपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी गमावली नोकरी)

आता प्रश्न असा आहे, कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार का? तज्ज्ञांच्या मते पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये होणाऱ्या बदलासाठी कच्च्या तेलाचे दरही कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती का कमी होत नाहीत याची कारणे :

-पहिलं कारण असं आहे की, भारतामध्ये पेट्रोल-डिझेलवर भारी टॅक्स आकारला जातो. देशात सध्या पेट्रोलवर 19.98 रुपये एक्साइज ड्यूटी आहे, तर वॅटसाठी 15.25 रुपये आकारण्यात येतात.

-पेट्रोल पंपाच्या डीलरला 3.55 रुपये कमिशन देण्यात येतं. प्रत्येक राज्यासाठी वॅटचे दर वेगवेगळे आहेत. 15 ते 33-34 रुपयांदरम्यान हे दर आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वेगळ्या आहेत. एक लीटर डिझेलवर हा टॅक्स 28 रुपये आहे. म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील अधिकतर हिस्सा हा टॅक्स आहे

-तर दुसरं कारण असं आहे की डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य कमी आहे. अर्थव्यवस्था कमजोर झाल्यामुळे रुपयाचे मूल्य देखील कमी होत आहे.

 

First published: June 2, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading