600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू

600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आता चीनमधून बाहेर पडणाऱ्या 600 विदेशी कंपन्या (Foreign Companies) भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आता चीनमधून बाहेर पडणाऱ्या 600 विदेशी कंपन्या (Foreign Companies) भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांनुसार या कंपन्यांबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. या योजनेसंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सर्व राज्यांशी संपर्क देखील केला आहे. जे राज्य काही सवलतीच्या स्तरावर आणि कमी वेळामध्ये प्लांट सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल त्याठिकाणी विदेशी कंपन्यांना जाण्यासंदर्भात सूट दिली जाणार आहे. याकरता राज्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

विदेशी कंपन्यांना भारतात आणण्याची तयारी सुरू

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, विदेशी कंपन्यांना देशामध्ये आणण्यासाठी राज्यांची भूमिका महत्त्वाची असेल. राज्यांमध्ये विदेशी कंपन्या त्या त्या राज्यात याव्यात यासाठी स्पर्धा व्हावी असा सरकारचा प्रयत्न असेल असही ते म्हणाले.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी! एप्रिलपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी गमावली नोकरी)

आता विदेशी कंपन्यांना एखाद्या ठिकाणी यूनिट सुरू करण्यात मुख्यत: जमीन मिळवणे आणि स्थानिक स्तरांवर मंजूरी मिळण्यात सर्वाधिक समस्या येते. अशावेळी राज्यांना तयार केले जात आहे की ते सर्वाधिक जमीन उपलब्ध करू शकतील. विदेशी कंपन्यांना भारतामध्ये जमीन अधीग्रहण करण्याबाबत अनेक भ्रम आहेत, ते दूर करणे आवश्यक असल्याचं गोयल म्हणाले. कोरोनाचे संकट असूनही भारतात गुंतवणूक वाढत आहे, हा एक चांगला संकेत आहे.

गोयल पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे अनेक समस्यांना जरी तोंड द्यावे लागले असले, तरीही काही संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. उद्योग जगताबरोबर मिळून सरकार पुढील आराखडा तयार करत आहे. वेगवेगळ्या उद्योंगांसाठी वेगवेगळा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

(हे वाचा-सराफा बाजार उघडण्यास सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर वाढले, इथे वाचा आजचे दर)

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने कृषी, खाणकाम आणि उद्योग क्षेत्रामध्ये बरेच बदल घडवून आणले आहेत. कॉर्पोरेट टॅक्समध्ये देखील मोठी कपात केली आहे.

First published: June 2, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या