Petrol Diesel Price: पुण्यामध्ये पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री

Petrol Diesel Price: पुण्यामध्ये पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री

Petrol Diesel Price in Pune: पुण्यामध्ये पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज पुण्यामध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 93.14 रुपये आहेत.

  • Share this:

पुणे, 05 फेब्रुवारी: देशभरामध्ये इंधनाचा दर वाढता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईमध्ये दर गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलचे दर नव्वदीपार आहेत. आता पुण्यामध्ये देखील (Petrol Diesel Price in Pune) पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 93.14 रुपये प्रति लीटर आहेत. यूपीए सरकारच्या काळात 2013 मध्ये हे दर 93 रुपये प्रति लीटरवर पोहोचले होते. त्यांनतर आज रेकॉर्ड स्तरावर पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. पेट्रोलचे भाव एवढ्या स्तरावर पोहोचल्याने त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर देखील उतरले होते.

ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढीलप्रमाणे आहेत इंधनाचे दर

पेट्रोल- 93.14 रुपये प्रति लीटर

डिझेल- 82.38 रुपये

सीएनजी- 55.50 रुपये

(हे वाचा-बंद होणार BSNL-MTNL? या कंपन्यांबाबत काय आहे सरकारचा प्लॅन)

दररोज सकाळी 6 वाजता बदलते इंधनाची किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

(हे वाचा-Gold Rates: सलग चौथ्या दिवशी उतरले सोन्याचे भाव, चांदीचीही झळाळी झाली कमी)

BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 5, 2021, 9:56 AM IST

ताज्या बातम्या