मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rates: सलग चौथ्या दिवशी उतरले सोन्याचे भाव, चांदीचीही झळाळी झाली कमी

Gold Rates: सलग चौथ्या दिवशी उतरले सोन्याचे भाव, चांदीचीही झळाळी झाली कमी

Gold Silver Price, 4 February 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत तर आज चांदीही उतरली आहे. जाणून घ्या काय आहे कारण

Gold Silver Price, 4 February 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत तर आज चांदीही उतरली आहे. जाणून घ्या काय आहे कारण

Gold Silver Price, 4 February 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत तर आज चांदीही उतरली आहे. जाणून घ्या काय आहे कारण

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: अर्थसंकल्पामध्ये (Budget 2021) सोन्यावरील कस्टम ड्युटी हटवल्यानंतर सातत्याने सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. सलग चार दिवस सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज देखील देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजी साधारण 322 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) प्रति किलो 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधीच्या सत्रात भारतीय बाजारात सोन्याचे दर 47,457 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे दर 68,142 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Markets) आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत तर चांदीचे दर स्थीर आहेत.

सोन्याचे नवे दर (Gold Price, 04 February 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं प्रति तोळा 322 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या घसरणीनंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47,137  रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,457 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,825 डॉलर प्रति औंस आहेत.

(हे वाचा-पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत आज पुन्हा वाढ, वर्षभरात 14 रुपयांनी महागलं इंधन)

चांदीचे नवे दर (Silver Price, 04 February 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरांत देखील घट झाली आहे. चांदीचे दर 1000 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत.  यानंतर चांदीचे दर प्रति किलो 67,170 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव  26.61 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.

का कमी झाले सोन्याचांदीचे दर?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांच्या मते आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 6 पैशांनी वाढले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 72.90 च्या स्तरावर पोहोचला आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याने आणि रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. शिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देखील सोन्याचे भाव कमी होत आहेत.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, The gold