• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today:ऑक्टोबर महिन्यात 5 रुपयांहून अधिक महागलं पेट्रोल-डिझेल, पाहा काय आहे आजचा रेट

Petrol Price Today:ऑक्टोबर महिन्यात 5 रुपयांहून अधिक महागलं पेट्रोल-डिझेल, पाहा काय आहे आजचा रेट

ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 20 हून अधिक वेळा इंधनदरात वाढ झाली आहे. आज मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलच्या किंमती सतत वाढत्या आहेत. देशातील काही शहरांत पेट्रोलचा दर 120 रुपयांजवळ पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 20 हून अधिक वेळा इंधनदरात वाढ झाली आहे. आज मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर 107.59 रुपये, तर डिझेलचा दर 96.32 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होतो आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पहिल्यांदा पेट्रोल 119.79, डिझेल 110.63 रुपये प्रति लीटर आहे. मध्यप्रदेशमध्ये पेट्रोलचा दर 119.08 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 108.25 रुपये आहे. चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 26 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 96.32 रुपये प्रति लीटर >> मुंबईमध्ये पेट्रोल 113.46 रुपये आणि डिझेल 104.38 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 104.52 रुपये आणि डिझेल 100.59 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 108.11 रुपये आणि डिझेल 99.43 रुपये प्रति लीटर केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 5.15 रुपये, डिझेल 5 रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेलचा भाव सतत वाढतो आहे.

    दोन हजाराच्या नोटेवरच्या काळ्या रेषा पाहिल्यात? उपयोग कळला तर चकीत व्हाल

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत किती? केंद्र आणि राज्य सरकार किती कर आकारतात?

    देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.
    Published by:Karishma
    First published: