Home /News /money /

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत किती? केंद्र आणि राज्य सरकार किती कर आकारतात?

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत किती? केंद्र आणि राज्य सरकार किती कर आकारतात?

सध्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलची किंमत (Petrol Price) लिटरला 110 ते 112 रुपयांच्या आसपास आहे; पण पेट्रोलची मूळ किंमत 44 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबई, 25 ऑक्टोबर : सध्या देशात पेट्रोल (Petrol)आणि डिझेलच्या (Diesel) किमती (Price) गगनाला भिडल्या असून, दररोज किमतींचा आलेख चढाच आहे. या इंधनाच्या भाववाढीच्या भडक्याने सर्वसामान्य जनता चिंताग्रस्त झाली असून, पेट्रोल-डिझेलचे दर इतके जास्त असण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने दिलेल्या वृत्तानुसार, देशातल्या बहुतांश शहरांमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति (Petrol Diesel rate) लिटर दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांत दररोज त्यात वाढच होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना (Oil Companies) देण्यात आला आहे. त्यामुळे तेल कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. गेल्या आठवड्यात सलग सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत (Petrol price in Delhi) पेट्रोलची किंमत विक्रमी 107.24 रुपये आणि मुंबईत (Mumbai) 113.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचली. दिल्लीत डिझेलची किंमत 95.97 रुपये प्रति लिटरवर, तर मुंबईत ती 104 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढलेल्या असणं. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेल्या रुपयाचं मूल्य कमी-जास्त होण्यावरही पेट्रोल-डिझेलच्या किमती अवलंबून असतात. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून लावला जाणारा कर, मालवाहतूक, डीलर शुल्क आणि डीलर कमिशन यांचाही समावेश पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होतो. या सगळ्यामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होते. इंधन दरवाढीचं टेन्शन का घ्यायचं? 71 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री मिळवा, कसं? सध्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलची किंमत लिटरला 110 ते 112 रुपयांच्या आसपास आहे; पण पेट्रोलची मूळ किंमत 44 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा मूळ दरही 45 ते 46 रुपयांच्या आसपास आहे. कर आणि इतर शुल्क समाविष्ट केल्यानंतर त्याची किंमत 95 रुपयांच्या पुढे गेली आहे. यावरून आपण राज्य आणि केंद्र सरकारला कर रूपाने, तसंच अन्य शुल्काच्या (Charges) रूपात किती पैसे देतो ते लक्षात येईल. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise Tax) आकारलं जातं. हे शुल्क देशात सर्वत्र समान असतं. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या केंद्रीय उत्पादन शुल्कात लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2014 मध्ये पेट्रोलवरचं केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 9.48 रुपये होतं. आता हे शुल्क आता जवळपास 33 रुपये प्रति लिटर झालं आहे. 2014 मध्ये डिझेलवरचं उत्पादन शुल्क 3.56 रुपये प्रति लिटर होतं. ते आता सुमारे 32 रुपये प्रति लिटर झालं आहे. त्याशिवाय पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटचे (VAT) दर प्रत्येक राज्यात वेगळे आहेत. दिल्लीचं उदाहरण बघितल्यास, 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत होती 44 रुपयांच्या आसपास. पेट्रोलवर आकारण्यात येणारं डीलर कमिशन प्रति लिटर 3.88 रुपये तर राज्य सरकारचा व्हॅट 24.34 रुपये, त्यामुळे पेट्रोलचा दर लिटरमागे 105.49 रुपये आहे. Petrol-Diesel Price: पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं, 20 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं सध्या देशात राजस्थानमध्ये (Rajasthan) पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट आकारला जात असून, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वांत महाग आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवताना त्यात डीलरचं कमिशनही समाविष्ट केलं जातं. त्यामुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे असतात.
First published:

Tags: Central government, Petrol and diesel

पुढील बातम्या