• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • दोन हजाराच्या नोटेवरच्या काळ्या रेषा पाहिल्यात? उपयोग कळला तर चकीत व्हाल

दोन हजाराच्या नोटेवरच्या काळ्या रेषा पाहिल्यात? उपयोग कळला तर चकीत व्हाल

आपण नेहमीच 500 किंवा दोन हजार रुपयांची नोट हातात घेतल्यानंतर ती खरी आहे का हे तपासून पाहतो. यासाठी आपण ती नोट उजेडात पाहून, मोकळ्या जागेत महात्मा गांधींचा फोटो दिसतो आहे का (How to check if currency note is real) हे तपासतो.

  • Share this:
मुंबई, 26 ऑक्टोबर : आपण नेहमीच 500 किंवा दोन हजार रुपयांची नोट हातात घेतल्यानंतर ती खरी आहे का हे तपासून पाहतो. यासाठी आपण ती नोट उजेडात पाहून, मोकळ्या जागेत महात्मा गांधींचा फोटो दिसतो आहे का (How to check if currency note is real) हे तपासतो. याव्यतिरिक्त आणखीही काही खुणा आहेत, ज्या आपल्याला केवळ खऱ्या नोटांवरच दिसून येतात. पण या सगळ्यात नोटेच्या बाजूला असलेल्या काळ्या रेघांकडे (Black lines on currency note) तुमचं कधी लक्ष गेलंय? कदाचित तुम्ही या रेषा पाहिल्याही असतील, मात्र त्या कशासाठी असतात याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. एखादी नोट खरी आहे की खोटी हे पाहण्यासाठी कित्येक खुणा (Indian currency note security marks) त्या नोटेवर असतात. यामध्ये महात्मा गांधींचा फोटो, अशोक स्तंभ, नोटेच्या मधल्या जागेपासून थोडी बाजूला असणारी काळी रेघ, आरबीआय गव्हर्नर यांची स्वाक्षरी अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. यासोबतच नोटेच्या बाजूला असणाऱ्या तिरप्या काळ्या रेघांचीही (Intaglio marks on currency note) यात महत्त्वाची भूमिका असते. मात्र, केवळ सिक्युरीटी फीचर म्हणूनच नाही, तर या रेघांचा आणखीही एक महत्त्वाचा फायदा नागरिकांना होतो. काळ्या रेघांची विशेष भूमिका जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल की या रेघांच्या जागी थोडासा उंचवटा जाणवतो आहे. या रेघा विशिष्ट प्रकारे प्रिंट करण्यात आलेल्या असतात. याला Intaglio प्रिंटिंग म्हणून ओळखलं जातं. थोडासा उंचवटा असल्यामुळे जेव्हा नेत्रहीन व्यक्ती (Currency note marks for blind people) नोटा हातात घेतात, तेव्हा त्यांच्या बोटांना या रेघा ठळकपणे जाणवतात. याच्या मदतीने त्यांना समजते, की हातात घेतलेली नोट नेमकी किती रुपयांची आहे. हा उंचवटा डोळे चांगले असलेल्या व्यक्तीलाही जाणवतो पण त्याला हे माहीतच नसतं. जशा डोळसांसाठी काही खुणा आहेत तशा नेत्रहीनांसाठी या विशिष्ट खुणा निर्माण केल्या आहेत. हे कसं काम करतं? 100 ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांवर या रेघा दिसून येतात. 100 रुपयांच्या नोटेवर दोन-दोनच्या सेटमध्ये अशा चार रेघा असतात. तर, 200 रुपयांच्या नोटेवर देखील अशा चारच रेघा असतात. पण या दोन-दोन रेघांमध्ये दोन बिंदूदेखील असतात. यामुळे 100 आणि 200 रुपयांच्या नोटांमध्ये फरक ओळखता येतो. 500 रुपयांच्या नोटेवर अशा पाच रेघा असतात. 2-1-2 अशा सेटमध्ये या रेघा दिसतात. तर 2000च्या नोटेवर 1-2-1-2-1 अशा सेटमध्ये एकूण सात रेघा असतात. यांच्या मदतीनेच नेत्रहीन लोकांनाही मिळालेली नोट किती रुपयांची आहे, आणि खरी आहे की खोटी आहे हे लक्षात येते. 2016 साली झालेल्या नोटबंदीनंतर एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. यावेळी दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये सुरक्षेसाठी चिप असणार आहे, अशी अफवादेखील पसरली होती. एकंदरीत, दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये ट्रॅकिंग चिप नसली तरी सुरक्षेसाठी आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी बरीच फीचर्स आहेत.
First published: