• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • हे आर्थिक काम करण्यासाठी केवळ 7 दिवस शिल्लक! बँकेत न जाता घरबसल्या करा पूर्ण

हे आर्थिक काम करण्यासाठी केवळ 7 दिवस शिल्लक! बँकेत न जाता घरबसल्या करा पूर्ण

जर तुम्ही पेन्शनधारक (Pensioners Life Certificate) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पेन्शनसोबतच दरवर्षी जीवन प्रमाणपत्र अर्थात लाइफ सर्टिफिकेटबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: जर तुम्ही पेन्शनधारक (Pensioners Life Certificate)  असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पेन्शनसोबतच दरवर्षी जीवन प्रमाणपत्र अर्थात लाइफ सर्टिफिकेटबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी केवळ 7 दिवस (7 days left to submit Pensioners Life Certificate) उरले आहेत. दरवर्षी पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही. आता तुम्हाला तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नाही, तर बँक अधिकारी तुमच्या घरी येऊन प्रमाणपत्र घेऊन जातील. जाणून घ्या कोणत्या बँका ही सेवा देत आहेत. या 12 बँका पेन्शनधारकांना घरबसल्या देत आहेत ही सुविधा   घरबसल्या मिळणाऱ्या या सेवेत तुम्ही बँक अधिकाऱ्याला फोन करून घरीच तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. या 12 बँकांच्या संख्येत SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, UCO बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. हे वाचा-महिलेनं ऑफिसला लावला 7 कोटींचा चुना, कारण ऐकून मालकालाही धक्का मात्र, या सर्व बँका घरपोच सेवा देण्यासाठी सेवा शुल्कही आकारत आहेत. वेगवेगळ्या बँकांसाठी सेवा शुल्क वेगवेगळे आहे. एसबीआय बँकेत तुम्हाला घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करायचे असेल, तर तुम्हाला 75 रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या बँकेकडून किती सेवा शुल्क आकारले जाते याची आगाऊ माहिती असणे आवश्यक आहे. हे वाचा-Paytm च्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? पोस्टमनकडेही देता येईल जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबर 2020 मध्ये, पोस्ट विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पोस्टमनद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची घरपोच सेवा सुरू केली. या सेवेद्वारे तुम्ही पोस्टमनला घरी फोन करून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: