Home /News /money /

Latent View Analytics Share: गुंतवणूकदारांना लॉटरी, दोन दिवसात पैसे तिप्पट

Latent View Analytics Share: गुंतवणूकदारांना लॉटरी, दोन दिवसात पैसे तिप्पट

लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सचा शेअर 24 नोव्हेंबर रोजी 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला पोहोचला आणि 586 रुपये 50 पैशांवर थांबला. जर आपण त्याच्या इश्यू किंमतीशी तुलना केली तर, स्टॉक जवळजवळ तिप्पट झाला आहे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर : पेटीएम आयपीओमध्ये (Paytm IPO) गुंतवलेले पैसे रिकव्हर होण्याची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत. तर दुसरीकडे लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सचा आयपीओमुळे (Latent View Analytics) गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. Latent View Analytics या शेअपने अवघ्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. स्टॉक 23 नोव्हेंबर रोजी त्याच्या इश्यू किमतीच्या 200 टक्के वर उघडला. त्याची इश्यू किंमत 197 होती आणि लिस्टिंग 512 रुपयांवर झाली. लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सचा शेअर 24 नोव्हेंबर रोजी 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला पोहोचला आणि 586 रुपये 50 पैशांवर थांबला. जर आपण त्याच्या इश्यू किंमतीशी तुलना केली तर, स्टॉक जवळजवळ तिप्पट झाला आहे. Indian Army Recruitment 2021: विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी 23 नोव्हेंबर रोजी या ग्लोबल डेटा आणि अॅनालिटिक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 148 टक्के वाढ झाली होती. 24 नोव्हेंबरला लेटेंट व्ह्यूचा शेअर 499 रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर हा स्टॉक दिवसभर खरेदी होत राहिला. शेवटी शेअर 20 टक्क्यांच्या वाढीसह 586.50 रुपयांवर बंद झाला. Latent View Analytics स्टॉक इतक्या वेगाने का वाढत आहे? तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या शेअरच्या आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण नाही. कंपनीचा व्यवसाय चांगला असून भविष्यात या व्यवसायात भरपूर वाव आहे. याशिवाय कंपनीचे चांगले आणि मोठे क्लायंट आहेत, त्यामुळे कंपनीचा हा व्यवसाय अधिक पसरताना दिसत आहे. यामुळेच मोठे गुंतवणूकदारही या शेअरमध्ये खरेदी करण्यास उत्सुक आहेत. लेटेंट व्ह्यू बिझनेस अॅनालिटिक्समध्ये डील करते आणि त्याच्या क्लायंटना अॅडव्हान्स प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स पुरवते. ही जागतिक स्तरावर डेटा इंजिनीअरिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या 3 वर्षांत LatentView ने Fortune 500 कंपन्यांचा भाग असलेल्या 30 कंपन्यांसोबत काम केले आहे. Indian Railway चा मोठा निर्णय; आता ट्रेनही भाड्याने घेता येणार, काय आहे योजना? गुंतवणूकदारांनी पुढे काय करायचं? या क्षेत्रातील सल्लागार लेटेंट व्ह्यूच्या स्टॉकला Happiest Mind शेअर प्रमाणे मानतात. Happiest Mind हा देखील असाच एक स्टॉक आहे, ज्याने सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना अनेक पटींनी पैसे दिले आहेत. या तज्ज्ञांना लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स स्टॉकमध्ये वाढ दिसत आहे आणि याचे कारण कंपनीचे काम आहे. कंपनी सतत नफा मिळवत आहे आणि आपल्या कामाचा आवाका वाढवत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या