मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दरमहा 10000 भरा अन् मिळवा 16 लाख रुपये, पोस्टाच्या योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या

दरमहा 10000 भरा अन् मिळवा 16 लाख रुपये, पोस्टाच्या योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खातं' (Post Office Recurring Deposit Account) ही पोस्ट ऑफिसची अशीच एक स्किम आहे. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये (Post Office RD Scheme) दर महिन्याला फक्त दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही पुढील दहा वर्षांत 16 लाख रुपये मिळवू शकता.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 जानेवारी : पैशांची बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध बँकां, पतसंस्था आणि पोस्ट ऑफिसमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीच्या या पर्यायांपैकी पतसंस्थांच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँका आणि पोस्ट ऑफिसचा पर्याय सर्वांत सुरक्षित ठरतो. कारण, आपल्या देशामध्ये आजही सर्वांत जास्त लोकसंख्या ही मध्यम वर्गामध्ये (Middle Class) मोडते. परिणामी आपल्या कष्टाच्या पैशांची सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक (Less Risk Investment) कशी होईल, याकडे सर्वात जास्त लक्ष दिलं जातं. एकूणच ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित राहतील आणि रिटर्न्सदेखील जास्त मिळतील, अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. म्हणूनच आजही अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सवर (Post Office Scheme) जास्त विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिसदेखील आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतं. या स्कीम्स मार्केट रिस्कपासून वेगळ्या आहेत आणि त्यातून चांगले रिटर्न्सही (Good Return Investment) मिळतात. एबीपी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

'पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खातं' (Post Office Recurring Deposit Account) ही पोस्ट ऑफिसची अशीच एक स्किम आहे. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये (Post Office RD Scheme) दर महिन्याला फक्त दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही पुढील दहा वर्षांत 16 लाख रुपये मिळवू शकता. या स्किमचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं असणं आवश्यक आहे. पोस्टामध्ये खातं सुरू करणं अतिशय सोपं आणि स्वस्त आहे. फक्त 100 रुपयांत पोस्टामध्ये आरडी अकाऊंट सुरू करता येतं.

फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट

विशेष म्हणजे एक व्यक्ती कितीही अकाऊंट सुरू करू शकते. फक्त तुम्हाला त्यासाठी दहा-दहा रुपयांच्या पटीत त्यात पैसे जमा करावे लागतील. याशिवाय तीन लोकांचं जॉईंट अकाऊंट (Joint Account) आणि अल्पवयीन मुलांच्या नावानंही अकाऊंट सुरू करता येतं. हे आरडी अकाऊंट 5 वर्षांच्या मुदतीसाठी उघडलं जातं. पण, गरज पडल्यास तुम्ही 3 वर्षांच्या काळातच 'प्रीमॅच्युअर क्लोजर'ही ((Premature Closure)) घेता येतं. आरडीमध्ये 12 हप्ते भरल्यानंतर तुम्हाला त्यावर कर्ज देखील मिळू शकतं.

Charging Station Business : चार्जिंग स्टेशन सुरु करा, कमी गुंतवणुकीत कमवा लाखो रुपये

पोस्ट ऑफिस आपल्या आरडी अकाऊंटवर 5.8 टक्के व्याज देत आहे. दर तीन महिन्यांनी कंपाउंडिंग बेसिसवर हे व्याज दिलं जातं. जर तुम्ही दरमहा आरडीमध्ये दहा रुपये जमा केले तर, पाच वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर (Maturity) व्याजासह सुमारे सहा लाख 96 हजार रुपये मिळतील. यापैकी 97 हजार रुपये निव्वळ व्याज (Interest Money) असेल. जर तुम्ही आरडी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला शेवटी 16 लाख 26 हजार रुपये मिळतील. यापैकी सुमारे 4 लाख 26 हजार निव्वळ व्याज मिळेल.

बँकातील व्याजदरांचा विचार केला तर सध्या व्याजदर खूप कमी झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवले तर नक्कीच जास्त फायदा होईल.

First published:

Tags: Investment, Money, Post office