मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: पेट्रोलचे भाव रेकॉर्ड स्तरावर, मुंबईत दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर

Petrol Price Today: पेट्रोलचे भाव रेकॉर्ड स्तरावर, मुंबईत दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे भाव सध्या (Petrol-Diesel Rate Today) जवळपास सर्वच ठिकाणी सर्वोच्च स्तरावर आहेत. अनेक शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 98.61 रुपये आणि डिझेलचे दर 90.11 रुपये प्रति लीटर आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 15 मे:  पेट्रोल-डिझेलचे भाव सध्या (Petrol-Diesel Rate Today) जवळपास सर्वच ठिकाणी सर्वोच्च स्तरावर आहेत. अनेक शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. दरम्यान तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही आहे. तर शुक्रवारी पेट्रोलचे दर प्रति लीटर 29 पैसे आणि डिझेलचे दर प्रति लीटर 34 पैशांनी वाढले होते.  मुंबईत पेट्रोलचे (Petrol Rates in Mumbai) दर 98.61 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Rates in Mumbai) 90.11 रुपये प्रति लीटर आहेत. गेल्या आठवड्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे इंधनाचे भाव ऑल टाइम हायवर आहेत.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी मिळवल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत, यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

हे वाचा-मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, मिळाले 2000 रुपये;वाचा सबंधित इतर योजनांचे फायदे

असे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. हे कोड आपण आयओसीएलच्या वेबसाइटवरून पाहू शकता. तर, आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत आपण बीपीसीएल (BPCL) ग्राहक आरएसपी (RSP) टाईप करून 9223112222 या क्रमांकाला आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

हे वाचा-LIC ची ही योजना देते महिना 9000, उत्पन्न वाढवण्यासाठी कशी करायची गुंतवणूक?

काय आहेत आजचे दर?

दिल्लीत पेट्रोल 92.34 रुपये तर डिझेल 82.95 रुपये प्रति लीटर आहे.

मुंबईत पेट्रोल 98.61 आणि डिझेल 90.11 रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 94.09 आणि डिझेल 87.81 रुपये प्रति लीटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 92.44 आणि डिझेल 85.79 रुपये प्रति लीटर आहे.

इंदूरमध्ये पेट्रोल 100.46 आणि डिझेल  91.40 रुपये प्रति लीटर आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल 100.38 आणि डिझेल 91.31 रुपये प्रति लीटर आहे.

First published: