Home /News /money /

Petrol Price Today: आज पेट्रोल महागलं की स्वस्त झालं? इथे वाचा इंधनाचा लेटेस्ट भाव

Petrol Price Today: आज पेट्रोल महागलं की स्वस्त झालं? इथे वाचा इंधनाचा लेटेस्ट भाव

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये (Fuel Price on 07th December) मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान आज 07 डिसेंबर रोजी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात जरी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नसले तरीही आजचे दर सामान्यांच्या खिशाला चाप बसवणारेच आहेत. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. याठिकाणी केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात (Kejriwal Government slashes vat on petrol) करण्यााच निर्णय घेतला होता. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये आज 1 लीटर पेट्रोलचा भाव 103.93 रुपयांवरून कमी होऊन 95.41 रुपये प्रति लीटर झाला आहे. हे वाचा-दोन ब्रोकरेज फर्मचा ICICI Bank शेअर खरेदीची शिफारस, टार्गेट प्राईज दोघांची वेगळी आजचे इंधनाचे दर >> दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर >> लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर >> गांधीनगरमध्ये पेट्रोल 95.35 रुपये आणि डिझेल 89.33 रुपये प्रति लीटर >> पोर्ट ब्लेअर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते हे वाचा-शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या