मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले, पुढील दिवस कसे असतील?

शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले, पुढील दिवस कसे असतील?

दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalisation) गेल्या दोन सत्रांमध्ये 5,80,016.37 कोटी रुपयांनी घसरून 2,56,72,774.66 कोटी रुपयांवर आले.

दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalisation) गेल्या दोन सत्रांमध्ये 5,80,016.37 कोटी रुपयांनी घसरून 2,56,72,774.66 कोटी रुपयांवर आले.

दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalisation) गेल्या दोन सत्रांमध्ये 5,80,016.37 कोटी रुपयांनी घसरून 2,56,72,774.66 कोटी रुपयांवर आले.

मुंबई, 6 डिसेंबर : भारतीय शेअर बाजारातील गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 5.80 लाख कोटी बुडाले आहेत. BSE चा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स (Sensex) सोमवारी 949.32 अंकांच्या घसरणीसह 56,747.14 अंकांवर बंद झाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Sensex 764.83 अंकांनी म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 57,696.46 अंकांवर बंद झाला.

या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalisation) गेल्या दोन सत्रांमध्ये 5,80,016.37 कोटी रुपयांनी घसरून 2,56,72,774.66 कोटी रुपयांवर आले. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉनच्या चिंतेमुळे मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजार घसरला.

Religare Broking लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष (रिसर्च), अजित मिश्रा म्हणाले की, शुक्रवारप्रमाणेच सोमवारीही बाजारात सुमारे 1.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. बाजाराची सुरुवात सपाट झाली, परंतु कमकुवत जागतिक संकेत आणि नवीन कोविड वेरिएंटच्या रुग्णांची वाढ यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रात विक्री झाल्याचे दिसून आले.

Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स

भारतात कोरोनाचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉनचे आतापर्यंत 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 17 रुग्णांची नोंद सोमवारी झाली आहे. ज्यामध्ये राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 9 जणांना, पुण्यात 7 जण आणि राजधानी दिल्लीत 37 वर्षीय पुरुषाला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये इंडसइंड बँकेत (IndusInd Bank) सर्वाधिक 4 टक्क्यांची घसरण झाली. ब्रॉडर मार्केटमध्ये, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही 1.35 टक्क्यांची घसरण झाली.

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी! सेन्सेक्समध्ये 949 तर निफ्टीत 284 अंकांची घसरण

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे (Motilal Oswal Financial Services Ltd ) ​​रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले की, कोविडच्या नवीन वेरिएंटबद्दलची चिंता आणि व्याजदरावरील RBI च्या आगामी बैठकीमुळे बाजार अस्थिर राहिला.

First published:

Tags: Money, Share market