Home /News /money /

दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मची ICICI Bank शेअर खरेदीची शिफारस, टार्गेट प्राईज दोघांचीही वेगळी

दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मची ICICI Bank शेअर खरेदीची शिफारस, टार्गेट प्राईज दोघांचीही वेगळी

एमके ग्लोबलने (Emkay Global Financial) ICICI बँकेसाठी 950 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. तर मोतीलाल ओसवालला (Motilal Oswal) वाटत आहे की हा स्टॉक 1000 च्या पातळीपर्यंत जाऊ शकतो.

    मुंबई, 6 डिसेंबर : आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) शेअरवर सध्या दोन मोठी ब्रोकरेज पॉझिटिव्ह आहेत. या ब्रोकरेज हाऊसेसच्या मते हा स्टॉक सध्याच्या पातळीपासून खूप वर जाऊ शकतो. या दोन ब्रोकरेज हाऊसपैकी एक एमके ग्लोबल फायनान्शिअल (Emkay Global Financial) आणि दुसरे मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) आहे. एमके ग्लोबलने ICICI बँकेसाठी 950 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. तर मोतीलाल ओसवालला वाटत आहे की हा स्टॉक 1000 च्या पातळीला स्पर्श करू शकतो. Emkay Global च्या मते, ICICI बँक हायपर-पर्सनलाइज्ड डिजिटल ऑफरिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. यात रिटेल, SME किंवा कॉर्पोरेट यांचा समावेश आहे. कस्टमर एक्सपिरिएन्स (Customer Experience) सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. बाजारातील सध्याच्या घसरणीदरम्यान हा शेअर खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचे एमके ग्लोबलने म्हटले आहे. Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स मोतीलाल ओसवाल यांचं मत काय? मोतीलाल ओसवाल यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की त्यांनी ICICIBC अॅनालिस्ट डेमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये मॅनेजमेंटने ग्राहकांचा अनुभव लक्षात घेऊन ते कसे काम करत आहेत हे स्पष्ट केले. बँक आपली डिजिटल क्षमता मजबूत करत आहे, ज्यामुळे बँकिंग सुलभ होईल. ICICIBC ने रिटेल ऍडव्हान्समध्ये चांगली वाढ दर्शवली आहे. ब्रोकरेज हाऊसने, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्ससाठी 1000 रुपयांचे टार्गेट सेट करत सांगितलं की बँकिंग क्षेत्रातील निवडींमध्ये या स्टॉकचा समावेश टॉपमध्ये केला जाईल. शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी! सेन्सेक्समध्ये 949 तर निफ्टीत 284 अंकांची घसरण ICICI बँकेने NSE वर 25 ऑक्टोबर 2021 रोजी 867 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून या समभागात सातत्याने घसरण होत आहे. सोमवार, 6 डिसेंबर 2021 रोजी, हा स्टॉक 0.94 टक्क्यांनी घसरून 709 55 रुपयांवर बंद झाला. तो आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीपासून 18 टक्क्यांनी घसरला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या