मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वयाच्या 12 व्या वर्षापासून Crypto Currency मध्ये गुंतवणूक; 18 व्या वर्षी झाला कोट्यवधी!

वयाच्या 12 व्या वर्षापासून Crypto Currency मध्ये गुंतवणूक; 18 व्या वर्षी झाला कोट्यवधी!

अवघ्या 12 व्या वर्षी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एरिकची अवघ्या दहा वर्षातील झेप थक्क करणारी आहे.

अवघ्या 12 व्या वर्षी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एरिकची अवघ्या दहा वर्षातील झेप थक्क करणारी आहे.

अवघ्या 12 व्या वर्षी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एरिकची अवघ्या दहा वर्षातील झेप थक्क करणारी आहे.

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : जगभरात आभासी चलन अर्थात व्हर्च्युअल करन्सी (Virtual Currency) आता सर्वज्ञात झाली आहे. आर्थिक व्यवहार करायचा असेल तर आपण चलनाचा वापर करतो. प्रत्येक देशाचे चलन ठरलेले असते. जसे आपल्या देशाचे चलन रुपया आहे. रुपयाच्या पटीतील नाणी, नोटा यांचा वापर रोख व्यवहारात केला जातो. तसेच आता आभासी चलन अर्थात व्हर्च्युअल करन्सी आली आहे. एका जपानी व्यक्तीने सर्वांत आधी या आभासी चलनाची जगाला ओळख करून दिली.

आज अनेक प्रकारची आभासी चलनं उपलब्ध आहेत, पण याचा वापर माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक यापासून दूर आहेत. फार कमी लोक या चलनाचा वापर करतात. अनेक देशांमध्ये या चलनाला अधिकृत मान्यता नाही. या चलनांमध्ये सर्वांत लोकप्रिय चलन आहे ते म्हणजे बिटकॉइन (Bitcoin).

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अत्यंत झपाट्याने प्रचंड परतावा देणारे चलन म्हणून बिटकॉइन प्रसिद्ध आहे. अनेकांना रातोरात श्रीमंत होण्याची संधी यामुळे मिळाली आहे. याचेच एक प्रत्यक्ष उदाहरण आहे एरिक फिनमन (Eric Finman). वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यानं बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली आणि अवघ्या सहा वर्षात तो कोट्याधीश (Billionaire) झाला. इतक्या कमी वयात बिटकॉइनमुळे कोट्याधीश होणारा आपण एकमेव व्यक्ती असल्याचा दावा एरिक करतो.

इडाहो ट्वीन (Edaho Twin) या उत्तर अमेरिकेतील एका शहरात राहणाऱ्या या मुलाने वयाच्या 12 व्या वर्षी 100 बिटकॉइन एक हजार डॉलर्स म्हणजे 47 हजार रुपयांमध्ये घेतले होते. आता 10 वर्षांनतर त्याची किंमत 50 कोटींच्या आसपास गेली आहे. सध्या एका बिटकॉइनची किंमत 50 लाख रुपये आहे. एरिक 18 वर्षांचा असताना त्याच्याकडील या 100 बिटकॉइनची किंमत कोट्यवधीच्या घरात पोहोचली होती,त्यामुळे एरिक 18 व्या वर्षीच कोट्याधीश झाला होता. त्याच वयात त्यानं दुसऱ्या एका क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केली आहे.

हे ही वाचा-तुमच्याकडेही आहेत PPF ची एकापेक्षा अधिक खाती? या सोप्या पद्धतीनं करा विलीन

अवघ्या सहा वर्षात क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) कोट्याधीश होण्यापर्यंतची मजल मारणाऱ्या एरिकला 15 व्या वर्षी शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याच मुलानं बॉटंगल नावाच्या शैक्षणिक स्टार्ट अपची स्थापना केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यानं हे स्टार्ट अप विकून टाकलं आणि 2 वर्षांनी डॉ. ऑक्टोपस सूटची निर्मिती केली. वयाच्या 20 व्या वर्षी त्यानं एक कृत्रिम उपग्रह (Satellite) दाखल केला. आता अवघ्या 22 वर्षांचा एरिक मोबाइल (Mobile) फोन क्षेत्रात उतरला असून त्यानं फ्रीडम (Freedom) म्हणून एक स्मार्टफोन दाखल केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कसलाही सेन्सर नाही. फ्री स्पीच आणि प्रायव्हसी फर्स्ट ही या फोनची टॅग लाईन आहे. या फोनची जगभरात चर्चा आहे. अवघ्या 12 व्या वर्षी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एरिकची अवघ्या दहा वर्षातील झेप थक्क करणारी आहे.

First published:

Tags: USA