Petrol Price Today: सामान्यांना झटका! एका महिन्यात पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक, पाहा आजचे दर

Petrol Price Today: सामान्यांना झटका! एका महिन्यात पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक, पाहा आजचे दर

Petrol Price Today: कोरोना काळात सामान्य माणूस मोठ्या प्रमाणात महागाईशी सामना करत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलचे वाढणारे दर सामान्यांच्या खिशाला न परवडणारे ठरत आहेत. देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर रेकॉर्ड हायवर पोहोचले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) सामान्य माणूस मोठ्या प्रमाणात महागाईशी (Inflation) सामना करत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलचे वाढणारे दर (Petrol and Diesel Price) सामान्यांच्या खिशाला न परवडणारे ठरत आहेत. देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर रेकॉर्ड हायवर पोहोचले आहेत. मे महिन्यात केवळ 18 दिवसात पेट्रोलचे दर 4.17 रुपये प्रति लीटरने वधारले होते. तर 18 दिवसात डिझेलच्या दरात 4.60 रुपये प्रति लीटर इतकी वाढ पाहायला मिळाली. आज पेट्रोलच्या दरात 27 पैसे तर डिझेलच्या दरात 23 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे.

सकाळी सहा वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

हे वाचा-तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम आजपासून बदलणार, वाचा सविस्तर

महत्त्वाच्या शहरातील आजचे इंधनाचे दर  (Petrol-Diesel price on 1 June 2021)

>> दिल्लीमध्ये पेट्रोल 94.49 रुपये आणि डिझेल 85.38 रुपये प्रति लीटर

>> मुंबईमध्ये पेट्रोल 100.72 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 95.99 रुपये आणि डिझेल 90.12 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 94.50 रुपये आणि डिझेल 88.23 रुपये प्रति लीटर

>> नोएडामध्ये पेट्रोल 91.91 रुपये आणि डिझेल 85.85 रुपये प्रति लीटर

>> भोपाळमध्ये पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.89 रुपये प्रति लीटर

हे वाचा-EPFO च्या नियमात बदल, कोरोना उपचारासाठी देखील काढता येतील पैसे; वाचा सविस्तर

>> लखनऊमध्ये पेट्रोल 91.83 रुपये आणि डिझेल 85.77 रुपये प्रति लीटर

>> बंगळुरूमध्ये पेट्रोल 97.64 रुपये आणि डिझेल 90.51 रुपये प्रति लीटर

>> पाटणामध्ये पेट्रोल 96.64 रुपये आणि डिझेल 90.66 रुपये प्रति लीटर

>> चंडीगडमध्ये पेट्रोल 90.89 रुपये आणि डिझेल 85.04 रुपये प्रति लीटर

देशातील या शहरात पेट्रोल रेकॉर्ड स्तरावर

>> जयपुरमध्ये पेट्रोल 101.02 रुपये आणि डिझेल 94.19 रुपये प्रति लीटर

>> राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 105.52 रुपये आणि डिझेल 98.32 रुपये प्रति लीटर

>> मध्य प्रदेशच्या रीवामध्ये पेट्रोल 104.82 रुपये आणि डिझेल 95.95 रुपये प्रति लीटर

>> मध्यप्रदेशच्या अनूपनगरमध्ये पेट्रोल 105.18 रुपये आणि डिझेल 96.28 रुपये प्रति लीटर

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 1, 2021, 9:33 AM IST

ताज्या बातम्या