• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: या शहरात पेट्रोलचे भाव जवळपास 100 रुपये प्रति लीटर, मुंबईत आहेत हे दर

Petrol-Diesel Price Today: या शहरात पेट्रोलचे भाव जवळपास 100 रुपये प्रति लीटर, मुंबईत आहेत हे दर

Petrol-Diesel Price Today: बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव उच्च स्तरावर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये  (Petrol-Diesel Price Today) वाढ केली आहे.  सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव उच्च स्तरावर आहेत. राजस्थानमधील गंगानगर याठिकाणी बुधवारी पेट्रोलचे दर सर्वाधिक म्हणजे 98.10 रुपये प्रति लीटर झाले आहेत याठिकाणी डिझेलचे दर 89.73 रुपये प्रति लीटर आहेत. हे दर देशातील सर्वाधिक दर आहेत. मुंबईमध्ये अद्याप पेट्रोलचे दर नव्वदीपारच आहेत. आज मुंबईत पेट्रोल 94.12 रुपये तर डिझेल 84.63 रुपये प्रति लीटर आहे. का वाढल्या इंधनाच्या किंमती? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ विक्रीवर होत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 60 डॉलर प्रति बॅरल झाले होते. यामुळेच देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव वधारले आहेत. तुमच्या शहरात काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर मुंबई- पेट्रोल 94.12 रुपये आणि डिझेल 84.63 रुपये प्रति लीटर पुणे- पेट्रोल 93.78 रुपये आणि डिझेल 83.02 रुपये प्रति दिल्ली- पेट्रोल 87.60 रुपये आणि डिझेल 77.73 रुपये प्रति लीटर (हे वाचा-तीन दिवस बँका राहणार बंद; पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प) कोलकाता- पेट्रोल 88.92 रुपये आणि डिझेल 81.31 रुपये प्रति लीटर चेन्नई-  पेट्रोल 89.96 रुपये आणि डिझेल 82.90 रुपये प्रति लीटर दररोज अपडेट केले जातात पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. (हे वाचा-नोकरी बदलल्यानंतर येणारी ही समस्या अशी सोडवा,PF खात्यामध्ये अशाप्रकारे करा अपडेट) BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: