नोकरी बदलल्यानंतर येणारी ही समस्या अशी सोडवा, PF खात्यामध्ये घरबसल्या करता येईल अपडेट
EPFO मध्ये पैशांसाठी क्लेम करण्याची प्रक्रिया ज्याप्रमाणे ऑनलाइन आणि सहज आहे तशीच एक सुविधा तुम्ही ऑनलाइन मिळवू शकता. EPFO ने कर्मचाऱ्यांचं आणखी एक काम सोपं केलं आहे.
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या ग्राहकांना विविध सुविधा ऑनलाइन देते. यामुळे घरबसल्या विविध कामं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. कोरोना काळातही अनेकांनी ईपीएफओमध्ये क्लेम करून त्यांचे हक्काचे पैसे अगदी सहज मिळवले होते. क्लेम करण्याची प्रक्रिया ज्याप्रमाणे ऑनलाइन आणि सहज आहे तशीच एक सुविधा तुम्ही ऑनलाइन मिळवू शकता. EPFO ने कर्मचाऱ्यांचं आणखी एक काम सोपं केलं आहे.
नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यामध्ये नोकरी सोडल्याची तारीख अर्थात डेट ऑफ एक्झिट (Date of Exit) अपडेट करण्यासाठी कंपनीमध्ये जाण्याची गरज भासत होती. आता कर्मचारी ही तारीख अपडेट करू शकतात. ऑनलाइन अगदी सोप्या पद्धतीने तुमचं हे काम पूर्ण होईल. पीएफ खाते ट्रान्सफर करताना किंवा त्यातून रक्कम काढताना डेट ऑफ एक्झिट आवश्यक अशते. EPFO ने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.