मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तीन दिवस बँका राहणार बंद; पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प होणार

तीन दिवस बँका राहणार बंद; पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प होणार

पुढील महिन्यात तीन दिवस बँका बंद असणार आहेत.

पुढील महिन्यात तीन दिवस बँका बंद असणार आहेत.

पुढील महिन्यात तीन दिवस बँका बंद असणार आहेत.

    नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : पुढील आठवड्यात दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे पुढील सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बँकांचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचा संप पुकारला आहे. पुढील महिन्यात 15 आणि 16 या दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात 14 तारखेला रविवार आला असल्याने या दिवशी बँकेला अधिकृत सुट्टी असते. आज हैदराबादमध्ये झालेल्या UFBU च्या मीटिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आला. या मीटिंगनुसार बँकांचं खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत 15 आणि 16 मार्च अशा दोन दिवस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार हे ही वाचा-खूशखबर! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या United Forum of Bank Unions (UFBU) यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. IDBI आणि LIC मधील व्यवहारातून 2019 पासूनच खासगीकरणाला सुरुवात झाली आहे. UFBU च्या बैठकीत जनरल सेक्रेटरी सी एच व्यंकटचलम म्हणाले की, बँकाचं खासगीकरण करण्यासंदर्भात सरकारचा विरोध केला जात आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात बँक क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बँकांचे काम याच आठवड्यात पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना बँकेने सावधान केले आहे.  बँकेने ग्राहकांना असे कोणतेही काम करण्यास नकार दिला आहे ज्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागेल. कोरोना काळापासून देशात ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राइमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हे घोटाळे टाळण्यासाठी बँक आणि सरकार वेळोवेली अ‍ॅलर्ट जारी करत आहे. बँक आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे त्यांच्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांना सावधान करते आणि यापासून वाचण्याचे उपायही सांगते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bank, Bank protest, Bank strike, March 2021, Money

    पुढील बातम्या