मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: इंधनाचे दर सामान्यांना न परवडणारेच! या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 113 रुपयांवर

Petrol-Diesel Price Today: इंधनाचे दर सामान्यांना न परवडणारेच! या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 113 रुपयांवर

रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today on 18 July) वाढले नसले तरी किंमती अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.

रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today on 18 July) वाढले नसले तरी किंमती अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.

रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today on 18 July) वाढले नसले तरी किंमती अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 जुलै: सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today on 18 July) किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही आहे. त्यामुळे आज सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी किंमती अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. शनिवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price In Delhi) 30 पैशांनी वधारले होते. यानंतर याठिकाणी पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लीटरच्या स्तरावर पोहोचले आहेत. शनिवारी डिझेलच्या किंमती दिल्लीत स्थिर होत्या

जुलै महिन्याबाबत बोलायचे झाले तर पेट्रोलच्या दरात 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात पाच वेळा घसरण झाली आहे. जून आणि मे मध्ये देखील जवळपास 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. सातत्याने होत असलेल्या या वाढीमुळे देशातील अनेक शहरात पेट्रोलचे दर शंभरीपार आहेत. काही ठिकाणं अशीही आहेत जिथे पेट्रोलचे दर 110 रुपयांपेक्षा जास्त आहेत

याठिकाणी मिळतंय सर्वात महाग पेट्रोल

आज सर्वात महाग पेट्रोल गंगानगर आणि मध्य प्रदेशमधील अनुपपूरमध्ये मिळत आहे. गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर 113.21 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 103.15 रुपये प्रति लीटर आहेत. अनुपपूरमध्ये आज पेट्रोलचा भाव 112.78 रुपये आणि डिझेलचा भाव 101.15 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रात इंधनाचे सर्वात जास्त दर परभणीमध्ये असतात. परभणीमध्ये आज पेट्रोलचे भाव 109.73 रुपये तर डिझेलचा दर 97.80 रुपये प्रति लीटर आहे.

हे वाचा-सरकारच्या या योजनेतून काढू शकता 5 लाखांपर्यंतची रक्कम, वाचा काय आहे नवा नियम

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

>> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

>> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई - पेट्रोल 102.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर

>> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर

हे वाचा-Home Loan संदर्भात सुवर्णसंधी! मिळवा 10000 पर्यंत Amazon गिफ्ट व्हाउचर

>> लखनऊ -पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर

>> पाटणा - पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.81 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर

>> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर

>> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

First published:

Tags: Petro price hike, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise