Home /News /money /

सरकारच्या या योजनेतून काढू शकता 5 लाखांपर्यंतची रक्कम, वाचा काय आहे नवा नियम

सरकारच्या या योजनेतून काढू शकता 5 लाखांपर्यंतची रक्कम, वाचा काय आहे नवा नियम

या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम एकदाच पूर्णपणे काढण्यास मंजुरी मिळू शकते.

    नवी दिल्ली, 18 जुलै: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) पेन्शन सिस्टम संदर्भात डेटा जारी केला आहे. यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की एनपीएस (NPS) योजनेत सब्सक्रायबर्सची संख्या वाढून 4.35 कोटीपर्यंत वाढली आहे. तुम्ही देखील नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System -NPS) योजनेशी जोडले जाऊन या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. लवकरच या स्कीममधून ग्राहकांना पूर्ण फंड काढण्याची मंजुरी मिळू शकते. अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, पेन्शन फंड रेग्यूलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (Pension Fund Regulatory and Development Authority - PFRDA) पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम एकदाच पूर्णपणे काढण्यास मंजुरी मिळू शकते. 5 लाखापर्यंत काढता येईल रक्कम देशामध्ये कोरोनाचा हाहाकार अद्यापही सुरूच आहे. अशावेळी आर्थिक चणचण भासत असल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. अशावेळी अशाप्रकारे पैसे काढण्याची मंजुरी मिळाल्यास अनेकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पाच लाखांपर्यंतची रक्कम काढता आल्यास काही ग्राहकांना दिलासा मिळेल. सध्याच्या नियमाअंतर्गत हे ग्राहक 2 लाख रुपये काढू शकतात. यापुढे पेन्शनर्स त्यांच्या कॉन्ट्रीब्यूशनच्या 60 टक्के रक्कम काढू शकतात तर 40 टक्के त्यांना जमा ठेवावी लागेल. हे वाचा-या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, वाढीव DA सह 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता दोन प्रकारचे आहेत NPS अकाउंट एनपीएस अकाउंट दोन प्रकारचे असतात. एक टिअर 1 आणि दुसरं टिअर 2. यामध्ये टिअर 1 पूर्णपणे पेन्शन अकाउंट आहे तर टिअर 2 एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. सध्याच्या अॅन्युटीजवर सरासरी रिटर्न जवळपास 5.5 टक्के आहे. सब्सक्रायबर्ससाठी इन्फ्लेशन आणि पेन्शनच्या रकमेवर इन्कम टॅक्ससह वास्तविक रिटर्न नेहमी कमी होतो. नवीन नियमाअंतर्गत एनपीएस होल्डर्स त्यांना ज्याठिकाणी चांगला रिटर्न मिळेल तिथे गुंतवणूक करू शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pension, Pension funds

    पुढील बातम्या