जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 5 दिवसात चौथ्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 5 दिवसात चौथ्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 5 दिवसात चौथ्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर

सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price Today) वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा मिळण्याची आशा दिसत नाही. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत (Fuel Prices Increase).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 मार्च : सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price Today) वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा मिळण्याची आशा दिसत नाही. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत (Fuel Prices Increase). तेल कंपन्यांनी 5 दिवसात 4 वेळा किंमत वाढवली आहे. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-86 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दर शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. SBI शेअरवर मोतीलाल ओसवाल बुलीश; 40 टक्के वाढीचा अंदाज, काय आहे कारण? मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर - मुंबई - मुंबईमध्ये शुक्रवारच्या तुलनेत पेट्रोलच्या किमतीत शुक्रवारच्या तुलनेत 84 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचे दर 112.51 रुपये प्रतिलिटर इतके आहेत. नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे, याठिकाणी आज पेट्रोलचे दर 97.81 रुपये प्रतिलिटर आहेत. कंपन्यांकडून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य लोकांचं बजेट बिघडू शकतं. गेल्या 5 दिवसात तेलाच्या किमती 4 वेळा वाढल्या आहेत. म्हणजेच पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागलं आहे. Supertech कडून घर खरेदी करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! कंपनी दिवाळखोर! घर खरेदीदारावर काय परिणाम होणार? देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. दोन्हीच्या दरात पुन्हा एकदा 80 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. तज्ञांच्या मते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढू शकतात. मूडीजच्या अहवालानुसार, तेल कंपन्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नव्हती, ज्यामुळे त्यांना 19,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होतं. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात