Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: राज्यात या शहरात होतेय सर्वात महाग पेट्रोलची विक्री, मुंबई-पुण्यात दर 109 रुपयांवर

Petrol-Diesel Price Today: राज्यात या शहरात होतेय सर्वात महाग पेट्रोलची विक्री, मुंबई-पुण्यात दर 109 रुपयांवर

आयओसीएलने आज मंगळवारचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 14th December) आजही स्थिर ठेवले आहेत.

    मुंबई, 14 डिसेंबर: आयओसीएलने आज मंगळवारचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 14th December) आजही स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-PF Balance: पीएफ बॅलन्स तपासणं झालं सोपं, मिस्ड कॉल देऊनही होईल काम दरम्यान महाराष्ट्रामध्ये देखील बहुतांश शहरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र काही ठिकाणी इंधनाच्या किंमतीत कमी-अधिक प्रमाणात चढउतार पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव सर्वाधिक आहे. आज परभणीत पेट्रोल 113.19 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलचा भाव 95.84 रुपये प्रति लीटर आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील लेटेस्ट पेट्रोल-डिझेलचे भा काय आहेत... महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे 109.70 रुपये 92.48 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    नाशिक 110.40 रुपये 93.16 रुपये
    नागपूर 109.71 रुपये 92.53 रुपये
    अहमदनगर 109.96 रुपये 92.75 रुपये
    औरंगाबाद 110.71 रुपये 93.46 रुपये
    रत्नागिरी 110.97 रुपये 93.68 रुपये
    परभणी 113.19 रुपये 95.84 रुपये
    पालघर 109.75 रुपये 93.16 रुपये
    सांगली 109.65 रुपये 92.47 रुपये
    कोल्हापूर 110.09 रुपये 92.89 रुपये
    अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-Home Loan संदर्भात या 10 गोष्टी ठेवा लक्षात; तुमचा अर्ज कधीच फेटाळला जाणार नाही इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol price

    पुढील बातम्या