नवी दिल्ली 13 डिसेंबर : आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न अनेकदा आवाक्याबाहेर असतं. त्यामुळे अशा वेळेस गृहकर्ज (Home Loan) घेऊन आपलं घराचं स्वप्न अनेकजण पूर्ण करतात. मात्र काहीवेळेस अगदी छोट्या छोट्या चुकांमुळे गृहकर्ज मिळत नाही. होम लोन घेऊन घर खरेदी करणं खरं तर सोपं आहे. पण हे कर्ज जास्त मुदतीचं असतं आणि हे दीर्घकालीन मुदतीचं कर्ज प्रत्येकालाच मिळतं असं नाही. लोन देणाऱ्या बँका (Bank) किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्या (Housing Finance Companies) अनेक मापदंडांवर अर्जाची छाननी करतात, तपासतात.
कर्ज परतफेड करण्याच्या क्षमतेबरोबरच अर्जदाराची पात्रता, अनुभव, कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या या सगळ्या गोष्टींचा गृहकर्ज देताना विचार केला जातो. यातील कोणत्याही एका गोष्टीची पूर्तता झाली नाही तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो. हे मापदंड नेमके काय आहेत ते बघूया-
100 टक्के लोन कुठेही मिळत नाही. काहीतरी गॅरंटी द्यावीच लागते.
डाऊन पेमेंट- (Down Payment)
प्रॉपर्टी (Property) म्हणजे मालमत्तेच्या बाजारभावाच्या (LTV) 80 टक्के लोन दिलं जातं. (30 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या मालमत्तेसाठी 90) उर्वरित पैसे म्हणजेच डाऊन पेमेंटची (Down Payment) सोय आपल्यालाच करावी लागते.
गॅरंटी- (Guarantee)
काहीवेळेस कर्ज देणारी बँक किंवा फायनान्स कंपनी मालमत्ता किंवा कारची गॅरंटी द्यायला सांगतात. म्हणजेच जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाहीत तर कर्जदार तुमची प्रॉपर्टी किंवा कार जप्त करतात. त्यामुळेच कर्जासाठी बँकेला कधीही चुकीची माहिती देऊ नका.
क्रेडिट यूज- (Credit Use)
जर तुमच्या नावावर अन्य कर्जही असतील तर तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता कमी असते.
पेमेंट हिस्ट्री- तुम्ही आधीची कर्ज वेळेवर फेडली आहेत का आणि तुम्ही हे कर्ज फेडण्यास सक्षम आहात का हे तुमच्या क्रेडिट आणि पेमेंट हिस्ट्रीवरून समजतं. या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारावरच क्रेडिट स्कोअर तयार केला जातो.
इन्कम (उत्पन्न)- (Income)
तुम्हाला किती कर्ज मिळू शकतं हे तुमच्या उत्पन्नावर बऱ्यापैकी अवलंबून असतं. तुमचं उत्पन्न जितकं जास्त तितकं जास्त कर्ज तुम्हाला द्यायला बँक किंवा फायनान्स कंपनी तयार होतात.
कार्ड ॲप्लिकेशन-(Card Application)
एकाच वेळेस अनेक नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास काही बँका किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्या त्याला आर्थिक संकट मानतात. अर्थात काही कर्जदाते मॉगेज लोन, कार लोन किंवा एज्युकेशन लोनसाठी करण्यात आलेल्या अर्जांची काळजी करत नाहीत.
डॉक्युमेंटेशन-(Documentation)
तुमची बचत आणि सेवानिवृत्त लोकांच्या खात्यांची सत्यता तपासण्यासाठी चालू व्यवहारांच्या पावत्यांची मागणी काही कर्जदाते करतात. काही वेळेस यामध्ये तफावत आढळल्यास बँकेचा अंडररायटिंग विभाग तुमच्याशी संपर्क साधतो
घर (House)
तुम्ही जर तुमचं घर घेण्याआधी भाड्याच्या घरात राहत असाल तर कर्जदाते तुमच्या आधीच्या घरमालकाशी संपर्क करण्यासाठी त्यांची माहिती मागू शकतात. जर तुम्ही तुमची काही संपत्ती गहाण ठेवली असेल तर तेही पेमेंट हिस्ट्रीमध्ये अगदी बारकाईनं बघितलं जातं.
कार्यकाळ- (Tenure)
होम लोन घेण्यासाठी तुमच्या पात्रतेनुसार एक ठराविक कालावधी ठरवला जातो. यालाच कार्यकाळ म्हणतात. तुम्हाला लोन किती वर्षांसाठी मिळालं आहे हे तुमचं वय आणि एका निश्चित कालावधीत कर्ज फेडण्याची तुमची क्षमता यावर हा कार्यकाळ ठरवला जातो.
अवलंबून सदस्य- (Dependent Family Members)
तुमच्या कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर भरु शकाल इतकं तुमचं उत्पन्न आवश्यक आहे.
पात्रता आणि अनुभव- ( Eligibility and Experience )
तुम्ही पगारदार असाल तर गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. व्यवसाय, उद्योग करत असाल तर तुमची कंपनी किंवा युनिट काही वर्षांपासून नफ्यात असणं आवश्यक आहे. कंपनीच्या नावाचा टॅक्स रिटर्नही नियमित फाईल होणं गरजेचं आहे.
या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर घरासाठी कर्ज मिळवताना काहीच अडचण येणार नाही आणि गृहकर्जाच्या आधारे तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.