Petrol-Diesel Price Today: सामान्यांना झटका! प. बंगाल निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत उसळी

Petrol-Diesel Price Today: सामान्यांना झटका! प. बंगाल निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत उसळी

Petrol-Diesel Price Today: 18 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा त्यात वाढ झाल्याने सामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 15 ते 20 पैसे प्रति लीटर अशी वाढ केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे: 18 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा त्यात वाढ झाल्याने सामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) पेट्रोलच्या किंमतीत 15 ते 20 पैसे प्रति लीटर अशी वाढ केली आहे. पेट्रोलच्या किंमतीत (Petrol Price) झालेल्या वाढीनंतर मुंबईतील दर प्रति लीटर 96.95 रुपये झाला आहे. तर मुंबईत डिझेलचा भाव (Diesel Price) 87.98 रुपये प्रति लीटर आहे. देशांतर्गत बाजारात वाढलेल्या या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे सामान्यांच्या खिशाला मात्र पुन्हा एकदा चाप बसला आहे.

18 दिवसांनी वाढले दर

याआधी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. 15 एप्रिलला शेवटी पेट्रोल 16 पैसे आणि डिझेल 14 पैसे प्रति लीटरने स्वस्त झालं होतं. त्यानंतर 18 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. गेले काही दिवस पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील निवणडणुकांची धामधूम सुरू होती, त्या दरम्यान पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते.

(हे वाचा-तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर धोक्याची घंटा! IT डिपार्टमेंट करेल जप्त)

महानगरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price on 4th May 2021)

>> दिल्लीमध्ये पेट्रोल 90.55 रुपये आणि डिझेल 80.91 रुपये प्रति लीटर

>> मुंबईमध्ये पेट्रोल 96.95 रुपये आणि डिझेल 87.98 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 92.55 रुपये आणि डिझेल 85.90 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 90.76 रुपये आणि डिझेल 83.78 रुपये प्रति लीटर

>> नोएडामध्ये पेट्रोल 88.92 रुपये आणि डिझेल 81.39 रुपये प्रति लीटर

(हे वाचा-सोन्याचे दर 60000 पार जाण्याची शक्यता, या 5 गोष्टी ठरणार कारणीभूत)

>> भोपाळमध्ये पेट्रोल 98.57 रुपये आणि डिझेल 89.17 रुपये प्रति लीटर

>> लखनऊमध्ये में पेट्रोल 88.84 रुपये आणि डिझेल 81.31 रुपये प्रति लीटर

>> बंगळुरूमध्ये पेट्रोल 93.60 रुपये आणि डिझेल 85.81 रुपये प्रति लीटर

>> चंडीगडमध्ये पेट्रोल 87.15 रुपये आणि डिझेल 80.62 रुपये प्रति लीटर

>> पाटणामध्ये पेट्रोल 92.87 रुपये आणि डिझेल 86.94 रुपये प्रति लीटर

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

(हे वाचा-या बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, Fixed Deposit वरील व्याजदरात केला बदल)

रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 4, 2021, 8:34 AM IST

ताज्या बातम्या