नवी दिल्ली, 02 मे: भारतामध्ये सोन्यात गुंतवणूक (Investment in Gold) करण्याला विशेष महत्त्व आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक पारंपरिक देखील मानली जाते त्याचप्रमाणे ही गुंतवणूक फायद्याची देखील आहे. मात्र तु्म्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की निश्चित मर्यादेनंतर सोनं खरेदी केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (CBDT) गाइडलाइननुसार एका निश्चित मर्यादेनंतर अधिक सोनं खरेदी करता येणार नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) नुसार जर तुम्ही सोने खरेदी केलं तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्याबाबत माहिती द्या. गाइडलाइनुसार निश्चित मर्यादेनंतर सोने खरेदी केल्यास त्याबाबत तुमच्याकडे इनव्हॉइस नसेल तर तर आयकर कायदा कलम 132 अंतर्गत तुमची चौकशी होऊ शकते. एक व्यक्ती किती सोनं बाळगू शकते? आयकर नियमानुसार जर एखादी व्यक्ती ते सोने कुठून आले, त्या सोन्याचा वैध स्रोत काय आहे, याचा पुरावा ती व्यक्ती देत असेल तर तीला घरात पाहिजे तितके सोने बाळगता येते. परंतु या उत्पन्नाचा स्रोत न सांगता एखाद्याला सोनं घरात बाळगायचं असेल तर त्याला एक मर्यादा आहे. नियमानुसार विवाहित महिला 500 ग्रॅम, अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुषांना 100 ग्रॅम सोनं कोणताही उत्पन्नाचा पुरावा न देता घरी ठेवता येईल. तीनही प्रकारात निश्चित मर्यादेमध्ये सोनं घरात घरात ठेवल्यास आयकर विभाग सोन्याचे दागिने जप्त करणार नाही. (हे वाचा- कमी पैशात दुप्पट फायदा, LICच्या या योजनेत एकदा गुंतवणूक करून मिळवा चांगला रिटर्न ) काय सांगतो नियम? सीबीडीटीने 1 डिसेबर 2016 रोजी एक निवेदन जारी करत असं म्हटलं होतं की, जर एखाद्या नागरिकाकडे वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यासह त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या सोन्याचे वैध स्त्रोत उपलब्ध आहेत आणि जर याचा पुरावा त्याला देता आला तर कितीही सोन्याचे दागिने आणि ऑर्नामेंट्स तो बाळगू शकतो. भारतीयांकडून खरेदी केलं जातं अमर्यादित सोनं भारतामध्ये अनेकांकडे त्यांच्या नातेवाइकांकडून किंवा पूर्वजांकडून इनव्हॉइसशिवाय मिळालेलं सोनं आहे. जर एखाद्याला गिफ्ट स्वरुपात 50000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सोन्याचे दागिने मिळाले किंवा वारसा हक्काने सोनं, सोन्याचे दागिने किंवा ऑर्नामेंट्स मिळाले असतील तर ते करयोग्य नाहीत, पण अशा प्रकरणात तुम्हाला सिद्ध करावं लागेल की ते सोनं गिफ्ट आहे किंवा वारसा हक्काने मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.