मराठी बातम्या /बातम्या /मनी /मल्टीबॅगर स्टॉक: पुढील 2-3 महिन्यात चांगला रिटर्न देईल हा शेअर, काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

मल्टीबॅगर स्टॉक: पुढील 2-3 महिन्यात चांगला रिटर्न देईल हा शेअर, काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

हा स्टॉक एका सरकारी कंपनीचा असून त्याचं नाव  शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Shipping Corporation of India)आहे. तुम्ही हा स्टॉक SCI नावाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शोधू शकता.

हा स्टॉक एका सरकारी कंपनीचा असून त्याचं नाव शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Shipping Corporation of India)आहे. तुम्ही हा स्टॉक SCI नावाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शोधू शकता.

हा स्टॉक एका सरकारी कंपनीचा असून त्याचं नाव शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Shipping Corporation of India)आहे. तुम्ही हा स्टॉक SCI नावाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शोधू शकता.

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Fall in November 2021) पाहायला मिळते आहे. शुक्रवारचा दिवस (26 नोव्हेंबर) तर शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. दरम्यान या होत असलेल्या घसरणीदरम्यान गुंतवणूक (Investment in Share Market) केली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेणेकरून बाजार वधारल्यावर चांगली कमाई करता येईल. मात्र घसरणीवेळी कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची ही ठरवणं कठीण होऊन जातं, कोणता स्टॉक मल्टीबॅगर होईल सांगता येत नाही. असा एक स्टॉक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यावर एक्सपर्टची नजर आहे, येणाऱ्या काही दिवसात हा स्टॉक मल्टीबॅगल होण्याची शक्यता आहे.

हा स्टॉक एका सरकारी कंपनीचा असून त्याचं नाव  शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Shipping Corporation of India)आहे. तुम्ही हा स्टॉक SCI नावाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शोधू शकता. या स्टॉकने आतापर्यंत चांगला रिटर्न दिला आहे. यावर्षी या स्टॉकने जवळपास 65% चा रिटर्न दिला आहे. या शेअर एका वर्षात 88.45 रुपयांवरुन (Shipping Corporation of India Share Price) 146.20 रुपयांवर पोहोचला आहे.

हे वाचा-डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

पुढील 2-3 महिन्या किती रिटर्न देईल हा स्टॉक

Choice Broking चे सुमित बगडिया यांचे असे म्हणणे आहे की या शेअरमध्ये जोरदार तेजी येण्याची शक्यता आहे. बगडिया यांचे असे म्हणणे आहे की हा शेअर त्याच्या सध्या 147 रुपयांच्या स्तरावरुन आणखी 37 टक्के वधारण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर SCI चा हा शेअर साधारण 200 रुपयांपर्यंत पोहचू शकतो. 2-3 महिन्यात या शेअरमध्ये 37 टक्क्यांची तेजी शक्य आहे.

हे वाचा-राकेश झुनझुनवालांचा या स्टॉकमुळे 753 कोटींचा तोटा, तुमच्याकडेही आहे हा शेअर?

टेक्निकली किती स्ट्राँग आहे हा शेअर?

सुमित बगडिया यांच्या मते, वीकली चार्टवर बुलिश फ्लॅग पॅटर्नच्या ब्रेकआउटनंतर हा स्टॉक बुलिश झोनमध्ये दिसून येत आहे. ज्यामुळे या स्टॉकमध्ये लाँग टर्म तेजीचे संकेत आहेत. काही आठवड्यात हा स्टॉर 145.50 रुपयांच्या स्तरावरुन वर जाताना दिसत आहे, स्टॉकमध्ये बुलिश ट्रेंडचे संकेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Share market