मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal Loan घेण्याचा विचार करताय? त्यापूर्वी Cibil Score सह लक्षात घ्या या गोष्टी; ठरेल फायद्याचे

Personal Loan घेण्याचा विचार करताय? त्यापूर्वी Cibil Score सह लक्षात घ्या या गोष्टी; ठरेल फायद्याचे

तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याची योजना आखत आहात का? तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्यात तर तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकता.

तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याची योजना आखत आहात का? तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्यात तर तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकता.

तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याची योजना आखत आहात का? तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्यात तर तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 27 जुलै: कोरोना काळात बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही देखील एखाद्या आपात्कालीन परिस्थितीसाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या. जेणेकरुन कर्ज घेताना तुमचं नुकसान होणार नाही. जसं की सिबील स्कोअर, कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला या घटकाबाबत माहिती असणं आवश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी अशा कोणत्या बाबी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, जाणून घ्या इथे..

आवश्यकतेपेक्षा जास्त उधार घेऊ नका

तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढ्याच कर्जासाठी अर्ज करा. काहीवेळा असं घडतं की ग्राहक आवश्यकतेपेक्षा जास्त कर्जासाठी पात्र असतात आणि मग ते गरज नसतानाही अधिक कर्ज घेतात. याचा परिणाम तुमच्या फायनान्शिअल गोल्सवर होईल. तुम्ही वेळेत हे कर्ज फेडू शकला नाहीत तर दंडही भरावा लागेल, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होईल आणि भविष्यात गरज पडल्यास कर्ज घेताना समस्या निर्माण होऊ शकतात.

हे वाचा-Gold Price: खूशखबर! स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर

व्याजदरांबाबत माहिती

कोणत्याही ठिकाणी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी त्याठिकाणी व्याजदर (Interest Rates on Personal Loan) किती आहे हे माहित करुन घेणं आवश्यक आहे. बँका, NBFCs अशा विविध ठिकाणी मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर तपासून पाहा, कमी व्याजदर असणाऱ्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. शिवाय ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्याठिकाणी प्री-अप्रूव्ह्ड लोनबाबत देखील माहिती करुन घेऊ शकता.

सिबिल स्कोअर

तुमचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवण्यात फायदा होईल. चांगला सिबिल स्कोअर तुमची प्रोसेसिंग फी आणि व्याज दर कमी करू शकतो. काही बँका चांगल्या क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फी कमी करण्याबरोबरच व्याजदर देखील कमी करतात. 750-900 दरम्यान सिबिल स्कोअर चांगला मानण्यात येतो, त्यापेक्षा कमी सिबिल स्कोअर असल्यास तुम्हाला अधिक व्याज दर द्यावा लागेल. शिवाय तुम्हाला कर्ज मिळण्यातही अडचण येऊ शकते. यामुळे सिबिल स्कोअरबाबत लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

प्रोसेसिंग फी आणि अन्य शुल्कांबाबत जाणून घ्या

वैयक्तिक कर्जामध्ये बँकांकडून काही हिडन चार्जेस आणि प्रोसेसिंग फी जोडले जातात. ज्याबाबत कर्ज देताना बँक कर्मचारी किंवा एजंट ग्राहकाला सांगतात. याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. शिवाय कर्ज वेळेआधी फेडण्यावर (प्री-पेमेंट क्लोजर) वसूल करण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही माहिती करून घ्या. अन्यथा नंतर समस्या येऊ शकते.

हे वाचा-HDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट

लक्षात घ्या रीपेमेंटची कपॅसिटी

कर्जाचा कालावधी निवडण्याआधी विचार करणं आवश्यक आहे. तुमची परतफेड करण्याची क्षमता लक्षात घेऊन कर्जाचे हप्ते आणि त्याकरताचा कालावधी निवडा. हप्ते फेडू न शकल्यास तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल, शिवाय सिबिल स्कोअरही खराब होईल. जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर कर्जाची परतफेड करा.

संबंधित बँकेकडून घ्या कर्ज

जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर शक्यतो त्याच बँकेत अर्ज करा ज्याठिकाणी तुमचं बचत खातं, फिक्स्ड डिपॉझिट किंवा क्रेडिट कार्ड सेवा आहे. कारण तुम्ही रेग्यूलर कस्टमर असल्यास लवकर आणि योग्य दरात कर्ज उपलब्ध केले जाते.

वैयक्तिक कर्जावर नाही द्यावा लागत कर

वैयक्तिक कर्जावर कर द्यावा लागत नाही. कारण कर्जाच्या रकमेस उत्पन्न मानले जात नाही. मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही कर्ज एखाद्या लीगर सोअर्सकडून म्हणजेच बँका किंवा NBFC कडून घेतले आहे. दरम्यान कर्जावर कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र दाखवावी लागतील. यामध्ये खर्चाचं व्हाउचर, बँक सर्टिफिकेशन, लोन सँक्शन लेटर आणि ऑडिटर लेटर इ. कागदपत्रांचा समावेश आहे.

First published:

Tags: Loan