• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • HDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट; वाचा कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा

HDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट; वाचा कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा

HDFC Bank ने दुकानदार ओव्हरड्राफ्ट स्कीम (Dukandar Overdraft Scheme) लाँच केली आहे. या स्कीमअंतर्गत ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 जुलै: खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) खातं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला व्यवसायासाठी रोखीची गरज असेल तर कोणत्याही प्रुफशिवाय तुम्हाला 10 लाख रुपये (Overdraft Facility) मिळतील. याकरता तुम्हाला सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट (Bank Statement) दाखवावं लागेल. बँकेने ही सेवा छोट्या रिटेलर्सना लक्षात घेऊन आणली आहे. कोरोना काळात आर्थिक नुकसानामुळे मोठा फटका छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. या खास सुविधेसाठी बँकेने सीएससी एसपीव्हीसह पार्टनरशीप केली आहे. बँकेने या सुविधेला  दुकानदार ओव्हरड्राफ्ट स्कीम (Dukandar Overdraft Scheme) असं नाव दिलं आहे. या सुविधेचे फायदा आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्यांना होणार आहे. कोणत्या ग्राहकांना मिळेल फायदा? दुकानदार ओव्हरड्राफ्ट स्कीमचा फायदा त्या रिटेलर्सना (Retailers) मिळेल, ज्यांचा व्यवसाय कमीतकमी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही कमीतकमी 50 हजार तर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांच्या रोख रक्कम मिळवू शकता. बँकेने असं म्हटलं आहे की रिटेलर्स, दुकानदार आणि ग्रामीण भागातील उद्योजक या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. हे वाचा-ग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट या स्कीममधील सर्वात चांगली बाब म्हणजे, ग्राहकांना कोणतीही गोष्ट तारण म्हणून किंवा सिक्युरिटी अथवा गॅरंटी म्हणून बँकेत ठेवावी लागणार नाही. शिवाय या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी बिझनेस फायनान्शिअल किंवा इन्कम टॅक्स रिटर्नची आवश्यकता नाही. कमी पेपपरवर्कची आवश्यकता आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी मोठ्या पेपरवर्कची अर्थात काही अतिरिक्त कागदपत्रांचीही आवश्यकता नाही. कमीत कमी वेळेत ग्राहकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा बँकेचा मानस आहे. हे वाचा-सोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम कुणाला किती मिळेल ओव्हरड्राफ्ट? -सहा वर्षांपासून कमी कालावधीसाठी व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना 7.5 लाख रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल -जे ग्राहक सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्यवसाय करत आहेत त्यांना दहा लाखाची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल -बँकेच्या 600 पेक्षा जास्त शाखा आणि व्हर्च्युअल रिलेशनशीप मॅनेजमेंट सपोर्ट करतील
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: