• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: खूशखबर! स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर

Gold Price Today: खूशखबर! स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचे सोन्याचांदीचे लेटेस्ट दर

Gold Price Today: तुम्ही देखील सोनेखरेदी करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत असाल, तर आज ही संधी मिळू शकते. आज देखील सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जुलै: आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या किंमती कमी झाल्यानंतर 27 जुलै रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) स्थिर आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर (Gold rate today) 0.02 टक्क्यांनी उतरले असून 47,450 रुपयांवर पोहोचले आहेत. सप्टेंबरमधील चांदीची वायदे (Silver Price Today) किंमत 0.22 टक्क्यांच्या घसरणीनंतर (Silver rates Today) दर 66,970 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. 47,100 रुपये राहतील सोन्याचे दर देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर ऑगस्टमध्ये  47,300-47,100 या स्तरावर राहू शकतात. एमसीएक्सवर सप्टेंबर सिल्व्हरचे दर 66,600 रुपयांच्या स्तराजवळ सपोर्ट करत आहेत. चांदीचे दर 67,300-68,000 रुपयांच्या आसपास राहू शकतात. सोन्याच्या मागणीला प्रोत्साहित करण्यासाठी डीलर भारतात सोन्यावर विशेष सूट देत आहेत. मीडिया अहवालांच्या मते सोन्यावर गेल्या महिनाभरातील सर्वाधिक डीलर डिस्काउंट मिळते आहे. हे वाचा-HDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट वेगवेगळ्या शहरातील सोन्याचे दर Good Returns वेबसाइटनुसार,  आज 24 कॅरेट सोन्याचे दर  4,787 रुपये प्रति ग्रॅम, 38,296 प्रति 8 ग्रॅम, 47,870 रुपये प्रति तोळा, 4,78,700 रुपये प्रति 100 ग्रॅम आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 46,870 रुपये प्रति तोळा आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,870 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47,870 रुपये प्रति तोळा आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,950 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 51,220 रुपये प्रति तोळा आहेत. हे वाचा-सरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी! केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर कोलकातामध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 47,250 रुपये आणि 49,950 रुपये आहे.  तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,200 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,310 रुपये आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: