मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी करण्याआधी तुमची मुलं होतील करोडपती! वाचा काय आहे योजना

नोकरी करण्याआधी तुमची मुलं होतील करोडपती! वाचा काय आहे योजना

म्युच्यूअल फंड (Mutual Fund) सध्याच्या काळात गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्यूअल फंडमध्ये तुम्ही केवळ तुमच्या नावाने नाही तर तुमच्या मुलांच्या नावाने देखील गुंतवणूक करू शकता.

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : म्युच्यूअल फंड (Mutual Fund) सध्याच्या काळात गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्यूअल फंडमध्ये तुम्ही केवळ तुमच्या नावाने नाही तर तुमच्या मुलांच्या नावाने देखील गुंतवणूक करू शकता. जर आई-वडिलांनी योग्य गुंतवणूक केल्यास त्यांची मुलगी किंवा मुलगा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत करोडपती होऊ शकतो. वाचा याबाबतीत सविस्तर... कशी कराल गुंतवणूक? मुलांसाठी सिंगल नावानेही म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करता येईल. मुलांच्या नावावर म्युच्यूअल फंड घेण्यासाठी तुमच्या मुलांचे बर्थ सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. मुलांचा पासपोर्ट असेल, तर तो देखील मान्य आहे. त्याचप्रमाणे आई-वडिलांची काही कागदपत्रे आवश्यक आहेत. मासिक असे जमा करा पैसे सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP) म्युच्यूअल फंडमधील सर्वात चर्चेत असणारा प्लॅन आहे. मुलांच्या नावाने एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. (हे वाचा-5 वर्षांऐवजी एकच वर्ष काम केल्यानंतर नोकरदार वर्गाला मिळणार ग्रॅच्युईटी?) तुमच्या मुलाचे वय 18 वर्षे झाल्यानंतर यामध्ये गुंतवणूक नाही करता येणार. तुमचे पाल्य 18 वर्षांचे झाल्यानंतर एक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंकर सर्व पैसे मुलाच्या नावावर केले जातील. 18व्या वर्षी करोडपती होऊ शकतात तुमची मुले जर तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच 5000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तो/ती 18 वर्षांचे झाल्यानंतर करोडपती होऊ शकतात. या गुंतवणुकीमध्ये दर 15 वर्षांनी वाढ करत जा. (हे वाचा-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 1,317 रुपयांने घटले सोन्याचे दर, चांदीही उतरली) जर या गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षी सरासरी 12 टक्के रिटर्न मिळाला तर तुमचे पाल्य अठराव्या वर्षी करोडपती झालेले असेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या