मराठी बातम्या /बातम्या /मनी /श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 1,317 रुपयांने घटले सोन्याचे दर, चांदीही उतरली; हे आहेत नवे भाव

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 1,317 रुपयांने घटले सोन्याचे दर, चांदीही उतरली; हे आहेत नवे भाव

सोन्याचांदीच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीना आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रेक लागला आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमती (Gold Prices Today) काहीशा घसरल्याचे पाहायला मिळाले.

सोन्याचांदीच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीना आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रेक लागला आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमती (Gold Prices Today) काहीशा घसरल्याचे पाहायला मिळाले.

सोन्याचांदीच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीना आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रेक लागला आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमती (Gold Prices Today) काहीशा घसरल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : सोन्याचांदीच्या वाढणाऱ्या किंमतीना आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रेक लागला आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमती (Gold Prices Today) काहीशा घसरल्याचे पाहायला मिळाले. आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 1,317 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर एक किलो चांदीचे भाव (Silver Prices Today) 2,943 रुपयांनी कमी झाले आहेत. व्यावसायिकांच्या मते रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 11 August 2020)

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती 56,080 रुपये प्रति तोळावरून घसरून 54,763 रुपये प्रति तोळावर पोहोचल्या आहेत. आज सोन्याचे भाव 1,317 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईमध्ये देखील 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे भाव कमी झाले आहेत. मुंबईत हा दर 54,528 रुपये प्रति तोळा आहे.

(हे वाचा-या बँकांमध्ये बचत खाते उघडल्यास अधिक फायदा, मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर)

चांदीचे नवे दर (Silver Price on 11 August 2020)

मंगळवारी सोन्याबरोबरच चांदीचे भावही उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चांदी रेकॉर्ड ब्रेकिंग स्तरावर आहे. मात्र आज हे भाव प्रति किलो 2,943 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये एक किलो चांदीचे भाव 76,543 रुपयांनी कमी होऊन 73,600 रुपये प्रति किलो आहेत. तर मुंबईत चांदी प्रति किलो 72,354 रुपयांवर आहे.

का घसरले सोन्याचे भाव?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनॅलिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांच्या मते अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले आहेत. परिणामी सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती कमी होऊन 1,989 डॉलर प्रति औंस या स्तरावर आल्या आहेत. त्याचप्रमाणे रशियामध्ये बनलेली कोरोनाची लस ग्लोबल सेंटिमेंट सुधारत आहे. ज्यामुळे शेअर बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारानी सोन्याची त्वरित विक्री केली आहे.

(हे वाचा-SBI अलर्ट! कोट्यवधी ग्राहकांना इशारा,पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्या या सूचना)

सोने आणखी स्वस्त कधी होणार?

कोटक सिक्योरिटीजने एका नोटमध्ये असे म्हटले आहे की, जर अमेरिकन डॉलरमध्ये आणखी मजबुती आल्यास सोन्यामधील घसरण वाढू शकते. या घसरणीची वाट पाहूनच नवीन सौदे करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today