मुंबई: गुंतवणुकीबाबत नागरिक आता सजग झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड , एसआयपी किंवा इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एलआयसी हा त्यापैकी सर्वांत जुना पर्याय आहे. त्यावर सर्वांचा विश्वासही भरपूर आहे. त्यामुळे एलआयसी ग्राहकांसाठी विविध पॉलिसीज आणते. कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा आणि जीवन विम्याचं संरक्षण असे अनेक फायदे हवे असतील, तर एलआयसीची नवी पॉलिसी उत्तम ठरेल. यात 71 रुपये गुंतवून 48.5 लाखांची मोठी रक्कम ग्राहकांना मिळू शकते. स्वतःच्या व कुटुंबीयांच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करण्याचं उद्दिष्ट गुंतवणूकदारांनी ठेवलेलं असतं. त्यासाठी एलआयसीची नवी पॉलिसी चांगला पर्याय ठरेल. न्यू प्रीमिअम एंडॉवमेंट प्लॅन या पॉलिसीमध्ये दररोज 71 रुपये गुंतवून मॅच्युरिटीनंतर 48.5 लाख रुपये इतकी मोठी रक्कम मिळू शकते. पॉलिसीची मुदत असेपर्यंत यात तुम्हाला ठरावीक व नियमित परतावा मिळू शकतो. तसंच पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर काही रक्कम मिळते. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी करता येऊ शकतो. या पॉलिसीमध्ये जीवनविम्याचं संरक्षण मिळतं. तसंच करसवलतही मिळू शकते.
Gold Silver Rate Today : चांदी 1000 तर सोनं 300 रुपयांनी स्वस्त; तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा आजचे दरही पॉलिसी घेऊन गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या एलआयसी कार्यालयाला भेट द्या. तिथल्या प्रतिनिधीकडून पॉलिसीबाबत माहिती घ्या. पॉलिसीविषयी अधिक माहिती घेतल्यावर ती तुम्हाला उपयोगी आहे का त्याबाबत कळू शकेल. ही पॉलिसी तुम्ही घेतली, तर त्यात किती रक्कम गुंतवता येईल व त्याचा परतावा किती मिळेल, याची माहिती तुम्हाला मिळेल. त्यानुसार तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याकरिता काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 55 वर्षं वयोगटाच्या व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतात. पॉलिसीचा कालावधी 12 ते 35 वर्षांपर्यंत असेल. पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळणारी कमीत कमी रक्कम 1 लाख रुपये असावी. जास्तीत जास्त रक्कम किती असावी, याबाबत काही नियम नाहीत. (5 हजारांच्या पटीत गुंतवणूक करणं गरजेचं असतं.) उदा. 18 वर्षाच्या व्यक्तीनं हा प्लॅन 35 वर्षांसाठी घेतला, तर 10 लाखांच्या परताव्यासाठी वर्षाला 26,534 रुपये भरावे लागतील. पुढच्या वर्षापासून ही रक्कम 25,962 रुपये इतकी कमी होईल.
कार लोनवरचं व्याज माफ करायचंय? फक्त ‘ही’ पद्धत एकदा वापरूनच पाहा!म्हणजेच दररोज 71 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर ग्राहकाला 48 लाखांचा परतावा मिळेल. त्यासाठी ग्राहकाची गुंतवणूक 9.09 लाखांची असेल. गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याची शक्यता हाच एलआयसीच्या नव्या पॉलिसीचा सर्वांत मोठा फायदा आहे. यामुळे कमीत कमी गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळेल. त्याशिवाय जीवनविम्याचं संरक्षणही मिळेल. ग्राहकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबीयांचं भविष्य सुरक्षित राहील. या पॉलिसीवर करसवलतही मिळते.
पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळणारा परतावा तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर व कालावधीवर अवलंबून असतो.