जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / कार लोनवरचं व्याज माफ करायचंय? फक्त 'ही' पद्धत एकदा वापरूनच पाहा!

कार लोनवरचं व्याज माफ करायचंय? फक्त 'ही' पद्धत एकदा वापरूनच पाहा!

बहुतांश जणांना कार घेण्यासाठी बँकेकडून कर्जच काढावं लागतं. कर्जापोटी ती व्यक्ती दर महिन्याला ईएमआय भरत असते.

बहुतांश जणांना कार घेण्यासाठी बँकेकडून कर्जच काढावं लागतं. कर्जापोटी ती व्यक्ती दर महिन्याला ईएमआय भरत असते.

बहुतांश जणांना कार घेण्यासाठी बँकेकडून कर्जच काढावं लागतं. कर्जापोटी ती व्यक्ती दर महिन्याला ईएमआय भरत असते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 डिसेंबर :  सध्याच्या युगात कार ही चैनीची वस्तू नसून गरज बनली आहे. प्रत्येकाला आपल्याकडे कार असावी असं वाटत असतं. बहुतांश जण बँकेकडून कारसाठी कर्ज घेतात आणि भरमसाठ व्याजही त्यावर भरावं लागतं. कार घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज पाहिजे असल्यास एक SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करून व्याजाची भरपाई आपण तिथून काढू शकतो. यातून व्याजाची रक्कम तर निघतेच; पण अतिरिक्त रक्कमही त्यातून मिळू शकते. तसं पाहायला गेलं तर कार खरेदी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. बहुतांश जणांना कार घेण्यासाठी बँकेकडून कर्जच काढावं लागतं. कर्जापोटी ती व्यक्ती दर महिन्याला ईएमआय भरत असते. ज्या बँकेकडून कर्ज काढलं जातं, ती बँक कर्जावर व्याज आकारते. (फक्त Nexonच नाही, Tataच्या ‘या’ Electric Carसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा किंमत अन् फिचर्स) याचाच अर्थ ईएमआयच्या रूपाने आपण दर महिन्याला जितकी रक्कम भरतो, त्यात मूळ रकमेसह व्याजाचाही समावेश असतो. व्याजमुक्त कर्ज मिळणं शक्य नाही. परंतु तुम्ही जितकं व्याज भरत आहात, तितकी रक्कम इतर मार्गांनी मिळवता येणं शक्य आहे. याबद्दल थोडं जाणून घेऊ या. कारसाठी कर्ज आणि व्याज एखादी व्यक्ती कारसाठी कर्ज घेते, तेव्हा व्याज कशाप्रकारे आकारलं जाऊ शकतं हे समजून घेऊ या. समजा कारसाठी तुम्ही 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं असेल, तर बँक त्यावर 8 टक्के व्याज आकारते. कर्जाचा कालावधी 5 वर्षांचा असेल तर ॲक्सिस बँकेच्या लोन कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला एकूण 1,08,292 रुपयांचं व्याज भरावा लागेल. यात दर महिन्याला तुम्हाला 10,138 रुपये ईएमआयच्या रूपात भरावे लागतील. याचाच अर्थ कर्ज फेडताना दर महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपयांच्या आसपास रक्कम कुठल्याही स्थितीत भरावी लागू शकते. एसआयपीत करा गुंतवणूक कारसाठी कर्ज काढतो, त्याच वेळी एक एसआयपी सुरू करायला हवी. दर महिन्याला यात गुंतवणूक करत राहावी. समजा महिन्याकाठी 5000 रुपये एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास आणि ही गुंतवणूक पाच वर्षं कायम ठेवल्यास आपल्या दीर्घ गुंतवणुकीवर 14 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतो. Groww च्या SIP कॅल्क्युलेटरनुसार, 5 वर्षांनी 1,36,000 रुपयांचा रिटर्न मिळेल. ही रक्कम कारसाठीच्या कर्जावरच्या व्याजापेक्षा अधिक आहे. म्हणजेच व्याजाची रक्कम सोडून अतिरिक्त 28 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात. परंतु एसआयपीत गुंतवणूक करताना बाजारातल्या जोखमीचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. (तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही ‘या’ 5 गोष्टी करू नका, अन्यथा…) आपण कार खरेदी करतो, त्याच वेळी एसआयपीची सुरुवात करायला हवी. आपण कर्ज किती घेत आहोत आणि एसआयपी किती गुंतवणूक करायची आहे याचं गणित आधीच मांडून घ्यावे आणि त्यानंतर बँकेत भरल्या जाणाऱ्या व्याजाची भरपाई एसआयपीच्या माध्यमातून कशी भरून काढता येईल, यावर लक्ष केंद्रित करावं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात