Home /News /money /

कोरोनामुळे गमवावी लागली नोकरी? या सोप्या मार्गांनी करा खर्चाचं नियोजन

कोरोनामुळे गमवावी लागली नोकरी? या सोप्या मार्गांनी करा खर्चाचं नियोजन

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. काहींना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.

    अनुपम रुंगटा (मनीकंट्रोल), मुंबई, 09 ऑक्टोबर : कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. काहींना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अशा काही व्यक्तींपैकी चिंतामणी एक आहे. चिंतामणी हा एक उत्तम आयुष्य जगणारा व्यक्ती आहे. आपल्या बायको आणि मुलांसह तो राहत आहे. चिंतामणी इंजिनीअर आहे आणि  बेंगळुरूमधल्या एका MNC मध्ये तो 12 वर्षांपासून काम करत आहे. सुखवस्तू आयुष्य जगण्यासाठी जितकी गरज आहे तितकं उत्पन्न त्याला मिळत आहे. त्यामुळं त्यानं आयुष्यातील इतर गोष्टींसाठी पैशांची तरतूद देखील केली आहे. त्याने विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आणि फिक्स डिपॉजिटमध्ये गुंतवणूक केली होती. इतरांसारखं आपलंदेखील एक स्वतःच घर असावं असं त्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने 30 लाख रुपये डाऊनपेमेंट करून घर घेतलं. यासाठी त्याला 40 हजार रुपये मासिक हफ्ता भरावा लागत होता. घराचा ताबा मिळाला नसल्यामुळे सध्या राहत असलेल्या घराचं भाडं देखील त्याला भरावं लागत होतं. पण कोरोनाच्या या काळात त्याची नोकरी गेली. त्यानंतर शोधूनही त्याला नोकरी मिळाली नाही. त्याच दरम्यान त्याला कोरोना झाल्यानं 12 लाख रुपये मेडिकल खर्चासाठी लागणार होते आणि कंपनीची पॉलिसी उपयोगी नव्हती. त्यानी वेगळी पॉलिसी काढली नव्हती. त्यामुळं त्याच सर्व आर्थिक गणित बिघडलं. (हे वाच-कर्जावरील EMI भरणाऱ्यांना दिलासा, RBI च्या पॉलिसीत रेपो रेटमध्ये बदलाव नाही) त्यानंतर त्यानं आपला हिशोब काढला तर महिन्याला 1 लाख 50 हजार रुपये खर्च येत आहे. चिंतामणी एकदम विपरित परिस्थिती अडकला होता. बचत केलेल्या पैशांत  त्याचा काही महिन्यांचा खर्च भागला पण बचत पूर्ण संपली. नंतर त्याला नोकरी मिळाली पण आयुष्यात संकट येण्याआधी काही आर्थिक गोष्टींचं नियोजन करणं महत्वाचं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि आपणही तसं करायला हवं.  त्याचा आर्थिक सल्लागार मित्र अजयनी त्याला आर्थिक नियोजन करण्याची पद्धत सांगितली. तुम्ही देखील अशाच पद्धतीने खर्चांचं नियोजन करू शकता. या पद्धतीनं करा नियोजन -सर्वात महत्त्वाची प्राथमिक गोष्ट कंपनीकडून इन्शूरन्स असला तरीही स्वतंत्र इन्शूरन्स पॉलिसी घेणं आवश्यक आहे. कारण काही प्रसंगात नोकरी अनिश्चिच असते. (हे वाचा-व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, मार्च तिमाहीत GDP सकारात्मक होईल- RBI गव्हर्नर) -तरुण वयात आरोग्य पॉलिसी काढल्याने हफ्ता देखील कमी पडतो. त्यामुळं वृद्धावस्थेत तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. -त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी म्हणून काही रक्कम नेहमी बाजूला ठेवणे. ही रक्कम आयुष्यात कधीही तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. Emergency Fund म्हणजे काय ? इमर्जन्सी फंड  ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. महिन्याला विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवणं ही रक्कम तुमच्या सरासरी मासिक खर्चावर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही भविष्यातील 6 ते 12 महिन्यांसाठी पैसे बाजूला ठेवून बचत करू शकता. समजा तुमचा महिन्याला खर्च दीड लाख रुपये असेल तर या 10 महिन्यांसाठी तुम्हाला 15 लाख रुपये बचत करणं गरजेचं आहे. (हे वाचा-Gold Rate Today- आज सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ, इथे वाचा गुरुवारचे नवे दर) त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ही रक्कम तुमच्या बचत खात्यात न ठेवता लिक्विड फंडात तसंच एफडीमध्ये गुंतवू शकता. त्यामुळे चिंतामणीनेदेखील या स्थितीतून धडा घेत इमर्जन्सी फंडसाठी बचत करायला सुरुवात केली. यामध्ये त्याने आपल्या भविष्यातील खर्चाचा अंदाज बांधला आहे. यामध्ये घर खर्च, आणि इतर हफ्त्यांचा देखील समावेश आहे. आपणही यातून धडा घेऊन आपल्या पैशांचं नियोजन करू शकतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या