• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Paytm च्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? वाचा सविस्तर

Paytm च्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? वाचा सविस्तर

Paytm Share 18 नोव्हेंबर रोजी, लिस्टिंगच्या दिवशी, पेटीएमचे शेअर्स 27 टक्क्यांपर्यंत खाली आले. यासह, पेटीएम जगातील सर्वात कमकुवत लिस्टिंग करणारी टेक कंपन्यांपैकी एक बनली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : निराशाजनक लिस्टिंगनंतर पेटीएमच्या शेअरचा (Paytm Share) चढता आले सुरु झाला आहे. पेटीएमच्या शेअर्समध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ झालेली पाहायला मिळाली. कमकुवत लिस्टिंगनंतर पहिल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी (Paytm Share Price) विक्री झाली आणि त्याचे मूल्य एक तृतीयांश खाली घसरले. मात्र बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी पेटीएमचे शेअर 14 टक्के वर चढले. दुपारी 2.50 वाजता, पेटीएमचे शेअर्स 15.11 टक्के वाढून 1720 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या तेजीमुळे कंपनीचे शेअर्स 2150 रुपयांच्या इश्यू किंमतीच्या जवळ पोहोचले आहेत. अजूनही शेअर ऑफर किंमतीपेक्षा 20 टक्के खाली ट्रेड करत आहेत. मिंटच्या म्हणण्यानुसार, Share India चे रिसर्च आणि उपाध्यक्ष रवी सिंग म्हणाले की, खालील पातळीवर झालेल्या खरेदीमुळे पेटीएमचे शेअर्समध्ये तेजी आली आहे. यासह कंपनीची पहिली बोर्ड बैठक 27 नोव्हेंबरला होणार आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार अपेक्षा करू शकतात की व्यवस्थापन काही चांगली बातमी देऊ शकते. यानुसार पेटीएमचे शेअर्स 1800 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात. Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी इलॉन मस्कसोबत केली स्वत:ची तुलना, काय आहे कारण? 18 नोव्हेंबर रोजी, लिस्टिंगच्या दिवशी, पेटीएमचे शेअर्स 27 टक्क्यांपर्यंत खाली आले. यासह, पेटीएम जगातील सर्वात कमकुवत लिस्टिंग करणारी टेक कंपन्यांपैकी एक बनली आहे. BharatPe चे संस्थापक Paytm च्या विजय शेखर शर्मांवर संतापले; गुंतवणूकदारांच्या नुकसानीसाठी जबाबदार धरलं Swastika Investmart चे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले, लिस्टिंगनंतर, शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी पेटीएममध्ये खरेदी करण्यास सुरुवात केली. शेअर 1400-1700 च्या दरम्यान ट्रेड करू शकतो. जर ते 1700 च्या वर राहिले तर त्यात खरेदी वाढू शकते. कंपनीचा इश्यू 1 नोव्हेंबरला उघडला आणि 3 नोव्हेंबरला बंद झाला. त्याची इश्यू किंमत 2080-2250 रुपये होती.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: