मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

महिलेनं ऑफिसला लावला 7 कोटींचा चुना, कारण ऐकून मालकालाही धक्का

महिलेनं ऑफिसला लावला 7 कोटींचा चुना, कारण ऐकून मालकालाही धक्का

महिलेनं आपल्या ऑफिसला (Woman steals 7 crore rupees from her employer to play gambling online) हातोहात चुना लावत 7 कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  desk news
सिडनी, 24 नोव्हेंबर: महिलेनं आपल्या ऑफिसला (Woman steals 7 crore rupees from her employer to play gambling online) हातोहात चुना लावत 7 कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेनं हे सगळं केलं ते केवळ जुगार खेळण्याच्या (Addiction of gambling) व्यसनापायी. अनेकांना जुगार खेळण्याचं व्यसन असतं आणि काही केल्या ते सुटत नाही. काहीजण त्या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, मात्र बरेच प्रयत्न करूनदेखील ते व्यसन सुटत नाही. यात अनेकांचा पैसा तर खर्च होतोच, शिवाय (Money and respect) त्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागत असते. जुगाराच्या व्यसनापायी एका महिलेनं तिच्या कंपनीला कोट्यवधींचा चुना लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. जुगाराचं जडलं व्यसन ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या रकेल नाओमी पेरी नावाच्या महिलेला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय जडली होती. या जुगारात पैसेही मिळत नसत. केवळ पॉईंट्स मिळत असत. मात्र हा जुगार खेळण्यासाठी आवश्यक असणारे पॉइंट्स हे पैसे देऊन विकत घ्यावे लागत. विकत घेऊन जुगार खेळल्यानंतर जरी ती डाव जिंकली, तरी केवळ पॉइंट्सच तिला मिळत असत. त्यामुळे हरलं किंवा जिकलं तरी तिला पैसे भरूनच नवा डाव खेळावा लागत असे. यासाठी पैसे जमवण्यासाठी तिने कार्यालयात मोठा आर्थिक घोळ केल्याचं दिसून आलं. बोगस व्यवहार रकेल ही एका व्हेटर्निटी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. 2016 ते 2019 या काळात तिने तिच्या कंपनीत अनेक गैरव्यवहार केले. या कंपनीत ती अकाउंट मॅनेजर या पदावर काम करत होती. तीन वर्षांच्या काळात तिने 475 फ्रॉड व्यवहार केले. रकेलकडे कंपनीच्या अकाउंटची पूर्ण जबाबदारी होती. त्याचा गैरफायदा घेत तिनं स्वतःचं दुसरं अकाउंट, क्रेडीट कार्ड आणि पर्सनल लोन यांचा वापर करत व्यवहार केल्याचं समोर आलं आहे. हे वाचा - Amazon विरुद्ध व्यापारी संघटनेचा एल्गार, देशातील 500 जिल्ह्यांमध्ये आंदोलन विशेष म्हणजे 90 च्या दशकातही तिला 5 लाखांपेक्षा मोठ्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं. त्यानंतर आता इतक्या वर्षांनीही तिची जुगाराची सवय गेली नसल्याचंच या घटनेतून दिसून आलं आहे.
First published:

Tags: Australia, Crime, Financial fraud

पुढील बातम्या