Home /News /money /

Pension Scheme : EPS ची 15 हजारांची मर्यादा हटणार, लिमीट आता दुप्पट होणार

Pension Scheme : EPS ची 15 हजारांची मर्यादा हटणार, लिमीट आता दुप्पट होणार

सध्या पेन्शनसाठी दरमहा 15 हजार रुपयांची कमाल मर्यादा किंवा कॅपिंग आहे, म्हणजे तुमचा पगार कितीही असो, परंतु पेन्शनचा हिशोब केवळ 15 हजार रुपयांवर असेल. यामुळे, ईपीएसवरील कॅपिंग काढून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

    मुंबई, 31 डिसेंबर : कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच ईपीएस (Employee Pension Scheme) अंतर्गत, सध्या पेन्शनसाठी दरमहा 15 हजार रुपयांची कमाल मर्यादा किंवा कॅपिंग आहे, म्हणजे तुमचा पगार कितीही असो, परंतु पेन्शनचा हिशोब केवळ 15 हजार रुपयांवर असेल. यामुळे, ईपीएसवरील कॅपिंग काढून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हे कॅपिंग काढण्यासाठीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 12 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय संघ आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ईपीएस सदस्य कधी होऊ शकतो? जेव्हा तुम्ही नोकरी करता आणि EPF चे सदस्य बनता, त्याच वेळी तुम्ही EPS चे सदस्य देखील बनता. सध्याच्या नियमांनुसार, EPS मध्ये मूळ वेतनाच्या 8.33 टक्के योगदान आहे. तथापि, पेन्शनपात्र पगाराची कमाल मर्यादा 15,000 रुपये आहे. अशा स्थितीत दरमहा जास्तीत जास्त 1250 रुपये पेन्शन फंडात जमा करता येतील. जर मूळ वेतन 10,000 रुपये असेल, तर योगदान 8.33 टक्के दराने 833 रुपये असेल. EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा! 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination जर तुम्ही 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS मध्ये योगदान देण्यास सुरुवात केली असेल, तर पेन्शनसाठी मासिक वेतन जास्तीत जास्त 6500 रुपये असेल. त्याच वेळी, 1 सप्टेंबर 2014 नंतर ईपीएसमध्ये सामील होणार्‍या कर्मचार्‍यांसाठी, पगाराची कमाल मर्यादा केवळ 15 हजार रुपये असेल. पेन्शन कॅल्क्युलेशन फॉर्म्युला? मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x EPS योगदान वर्षे) / 70 समजा एखादा कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 नंतर EPS मध्ये सामील झाला असेल आणि त्याचा पगार 30,000 रुपये आहे आणि त्याने 30 वर्षे काम केले असेल, तर त्याची मासिक पेन्शन = 15,000X30/70 म्हणजे 6,828 रुपये असेल. कोरोना काळात लग्न थांबल्यास नो टेन्शन! ₹7500मध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचा विमा कॅपिंग काढून टाकल्यास तुम्हाला किती पेन्शन मिळेल? पेन्शनसाठी दरमहा 15 हजार रुपयांची कमाल मर्यादा किंवा कॅपिंग काढून टाकल्यास आणि तुमचा पगार 30 हजार असेल तर तुमचे मासिक पेन्शन (30,000 X 30)/70 म्हणजेच 12,857 रुपये होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Epfo news, Money, Pension scheme

    पुढील बातम्या