मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा! 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination

EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा! 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination

EPFO E-Nomination Update: ईपीएफओने त्यांच्या सब्सक्रायबर्सना मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही जर 31 डिसेंबर डेडलाइन आहे म्हणून घाईघाईत ई-नॉमिनेशन प्रक्रिया करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही डेडलाइन आता पुढे ढकलण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 डिसेंबर: जर तुम्ही नोकरदार वर्गापैकी असाल आणि पीएफ खात्यामध्ये तुमचे दरमहा योगदान जमा होत असेल तर ही बातमी तुमच्याासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO Alert) त्यांच्या सब्सक्रायबर्सना मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही जर 31 डिसेंबर डेडलाइन आहे म्हणून घाईघाईत ई-नॉमिनेशन प्रक्रिया करणार असाल, तर लक्ष द्या. आता ही डेडलाइन (EPFO E-nomination Deadline) पुढे ढकलण्यात आली आहे. आता 31 डिसेंबर 2021 नंतरही तुम्हाला ई-नॉमिनेशनची (EPFO E-nomination Deadline extended) प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ईपीएफओच्या पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचणी आल्याची समस्याही अनेक सब्सक्रायबर्सनी व्यक्त केली आहे.

ईपीएफओने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ही डेडलाइन कधीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे याबाबत ईपीएफओने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र हे काम पूर्ण करण्याला सल्ला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिला आहे.

तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी EPF/EPS खात्यात ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे. EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला PF, निवृत्तीवेतन आणि विमा (EDLI) हे लाभ सहजपणे मिळण्यास यामुळे मदत होते. नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन क्लेम करण्याची सुविधा देखील मिळते. तुम्ही ई-नॉमिनेशनची प्रक्रिया घरबसल्या देखील करू शकता.

हे वाचा-Gold Price Today: 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव उतरले, वाचा काय आहे लेटेस्ट दर

नॉमिनी जोडण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

>> सर्वप्रथम ईपीएफओची अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in ओपन करा. याठिकाणी सर्व्हिस टॅबवर क्लिक करुन,  For Employees चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Member UAN / Online Service वर क्लिक करा.

>> आता तुम्हाला UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.

>> मॅनेज सेक्शनमध्ये जाऊन ई-नामांकन (e-Nomination) लिंकवर क्लिक करा.

>> आता नॉमिनीचे नाव आणि इतर तपशील भरा. यानंतर तुम्हाला Provide Details दिसेल, यामध्ये तुम्हाला काही अपडेट करायचे असेल तर Yes वर क्लिक करुन नवीन माहिती भरुन सेव्ह करा, अन्यथा सेव्ह वर क्लिक करा.

हे वाचा-Business: घरच्या घरी सुरु करा फ्रोझन मटारचा व्यवसाय ; कसा? ते घ्या जाणून

>> जर तुम्ही Yes वर क्लिक केले तर तुम्हाल कुटुंबाची माहिती विचारली जाते. यात Add Family Details वर क्लिक करा. तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडता येतील. याठिकाणी त्यांची भागीदारी देखील तुम्हाला निश्चित करता येईल. ही माहिती भरल्यानंतर  Save EPF Nomination वर क्लिक करा.

>> यानंतर आधारशी लिंक मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी येईल, तो प्रविष्ट केल्यानंतर तुमची ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news