Intel-Jio Deal: रिलायन्स JIO मध्ये इंटेल करणार 1,894.5 कोटींची गुंतवणूक, 11 आठवड्यातील बारावा मोठा करार

Intel-Jio Deal: रिलायन्स JIO मध्ये इंटेल करणार 1,894.5 कोटींची गुंतवणूक, 11 आठवड्यातील बारावा मोठा करार

रिलायन्स समुहाने (Reliance Industries Limited RIL) शुक्रवारी अशी घोषणा केली की, इंटेल ही कंपनी (Intel) रिलायन्सची टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्मध्ये (Jio Platform) 0.39 टक्के भागीदारीसाठी 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : रिलायन्स समुहाने (Reliance Industries Limited RIL) शुक्रवारी अशी घोषणा केली की, इंटेल ही कंपनी (Intel) रिलायन्सची टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्मध्ये (Jio Platform) 0.39 टक्के भागीदारीसाठी 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गेल्या अकरा आठवड्यामध्ये जिओमध्ये होणारी ही बारावी मोठी आणि ऐतिहासिक गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये करण्यात आलेली एकूण गुंतवणूक 1,17,588.45 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान जिओमध्ये आतापर्यंत फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स (दोन गुंतवणूक), विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलँटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटेरटॉन, पीआयएफ आणि आता इंटेल या जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

जगभरात पहिल्यांदाच सलग एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड्स निर्माण करण्यात आले आहेत. जिओ प्लॅटफॉर्म अंतर्गत मुव्ही, न्यूज आणि म्युझिक App शिवाय टेलिकॉम कंपनी येते. जिओ प्लॅटफॉर्म जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना गुंतवणूक करण्यामध्ये यशस्वी झाला आहे.

(हे वाचा-नोकरी जाण्याची भीती असल्यास सुरू करा हा व्यवसाय, करू शकता लाखोंची कमाई)

जिओमध्ये गुंतवणूकीची सुरूवात फेसबुक या कंपनीपासून झाली. फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्मवर 9.99 टक्के भागीदारी खरेदी करत 43,574 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर सिल्व्हर लेक पार्टनर्स (दोन गुंतवणूक), विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलँटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटेरटॉन, पीआयएफ आणि आता इंटेल यांनी जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली.

इंटेल कॅपिटल ही इंटेल कॉर्पोरेशनची (Intel Corporation) गुंतवणूक शाखा आहे. इंटेल सेमीकंडक्टर उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे, जे संगणकीय आणि संप्रेषण तंत्रज्ञानासह जागतिक परिवर्तनांचा पाया आहे.गेल्या दोन दशकांपासून इंटेल भारतामध्ये कार्यरत आहे.  बंगळुरू आणि हैदराबाद याठिकाणी इंटेलमधये हजारो कर्मचारी काम करत आहेत.

इंटेल कॅपिटल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, स्वायत्त वाहने, डेटासेंटर आणि क्लाऊड, 5 जी, नेक्स्ट जनरेशन कॉम्प्यूटर आणि इतर तंत्रज्ञान असणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करते. 1991 पासून, इंटेल कॅपिटलने जगभरातील 1582 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये 12.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 3, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading