मराठी बातम्या /बातम्या /मनी /Pension Rule BIG Change: पेन्शन नियमात मोठा बदल, आता या तारखेला मिळणार निवृत्ती वेतन

Pension Rule BIG Change: पेन्शन नियमात मोठा बदल, आता या तारखेला मिळणार निवृत्ती वेतन

कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार

कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओनं (EPFO) आपल्या पेन्शनधारक खातेदारांना आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओनं खातेधारकांच्या तक्रारींची दखल घेऊन पेन्शनच्या (EPFO changes Pension rules) नियमात महत्त्वाचा बदल केला आहे

  मुंबई, 20 जानेवारी: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओनं (EPFO Alert) आपल्या पेन्शनधारक खातेदारांना आनंदाची (Epfo Pensioners) बातमी दिली आहे. ईपीएफओनं खातेधारकांच्या तक्रारींची दखल घेऊन पेन्शनच्या (EPFO changes Pension rules) नियमात महत्त्वाचा बदल केला असून, आता आता दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशीच पेन्शन खात्यात (Pension Credited in Bank Account) जमा होणार आहे. पेन्शन खात्यात वेळेत जमा होत नसल्याची बहुसंख्य पेन्शन धारकांची तक्रार होती. त्याची दखल घेत ईपीएफओनं हा महत्त्वपूर्ण बदल केला असून, 13 जानेवारी 22ला एक परिपत्रक काढून या बदलाची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे असंख्य पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना या नियमाचा फायदा होणार आहे.

  या आधी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी (First Working day of Every Month) पेन्शन जमा होत असे किंवा जास्तीत जास्त 5 तारखेच्या आत पेन्शन जमा केली जात असे. मात्र यामुळं पेन्शनवर अवलंबून असलेल्या पेन्शन धारकांना यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे. यामुळे ईपीएफओच्या पेन्शन विभागानं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन पेन्शनधारकांच्या अडचणींवर विचार केला आणि पेन्शन खात्यात जमा करण्याच्या तारखेबाबतच्या नियमात बदल केले. आता यापुढे सर्व फिल्ड ऑफिसर्स (Field Officers) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन जमा होईल. यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कागदपत्रे बँकांना पाठवतील, असे निर्देश ईपीएफओनं दिले आहेत. यात अपवाद फक्त मार्च महिन्याचा करण्यात आला आहे. आर्थिक वर्षाखेर असल्यानं मार्च महिन्या अखेर पेन्शन जमा न होता ती 1 एप्रिल किंवा त्यानंतर जमा होईल, असं ईपीएफओनं परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.

  हे वाचा-चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावं?

  पेन्शन बँक खात्यात जमा होण्याच्या दोन दिवस आधीच ती संबधित बँकांकडे (Bank) जमा झाली आहे, याची खात्री करणं आवश्यक असून, पेन्शन वेळेत जमा होण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना संबधित यंत्रणेला दयाव्यात असंही ईपीएफओनं परिपत्रकात म्हटलं आहे. महिनाअखेरीसच पेन्शन खात्यात जमा झाल्यानं पेन्शनवर अवलंबून असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

  मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळून 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी वेतन मिळणाऱ्या खासगी क्षेत्रातील (Private Sector) प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएस (EPS) अंतर्गत नोंदणी करणं अनिवार्य आहे. यामुळे 58 व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर दरमहा ठराविक रक्कम मिळण्याची हमी देण्यात आली आहे. यासाठी दरमहा कर्मचारी आणि कंपनी वेतनाच्या 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा करतात. त्यापैकी कंपनीनं (Employer) दिलेल्या योगदानातील 8.33 टक्के रक्कम, तर कर्मचाऱ्याच्या योगदानाची संपूर्ण रक्कम ही ईपीएससाठी पेन्शन निधीत जमा केली जाते.

  हे वाचा-SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता फसवून कुणी काढू शकत नाही तुमच्या ATM मधून पैसे

  ईपीएफओची ईपीएस 95 ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार असून, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक सुरक्षितता देणारी ही महत्त्वाची योजना आहे. आता पेन्शन जमा होण्याच्या तारखेत केलेल्या या मोठ्या बदलामुळे तर लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  First published:

  Tags: Epfo news, Pension, Pension funds