मराठी बातम्या /बातम्या /मनी /नोकरी बदलताना PF अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही, EPFO चा निर्णय

नोकरी बदलताना PF अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही, EPFO चा निर्णय

मात्र आता नोकरी बदलल्यास तुम्हाला तुमचे पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही. रिटायमेंट फंड बॉडी एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) च्या ताज्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे.

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : खासगी नोकरी (Private Job) म्हटलं की काही वर्षांनी ती बदलून नवीन ठिकाणी रुजू होणे ही सामान्य बाब आहेत. मात्र या सर्व नोकरी बदलांमध्ये एक गोष्ट नेहमी करावी लागयची ती म्हणजे पीएफ अकाऊंट ट्रान्सफर (PF Account Transfer) करावं लागतं. मात्र आता नोकरी बदलल्यास तुम्हाला तुमचे पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही. रिटायमेंट फंड बॉडी एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) च्या ताज्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे.

EPFO ने IT- एनेबल्ड सिस्टम्स डेव्हलप करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) ला मान्यता दिली आहे. या सिस्टमच्या डेव्हलपनंतर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तरी त्याचा पीएफ खाते क्रमांक बदलणार नाही. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना नोकरी बदलताना प्रत्येक वेळी त्यांचा पीएफ क्रमांक बदलावा लागत होता.

Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट

नवीन सिस्टमच्या निर्मितीमुळे एक सेंट्रल डेटाबेस तयार केला जाईल, ज्यामुळे काम पूर्वीपेक्षा सोपे होईल. या प्रणालीमुळे एकाच कर्मचाऱ्याच्या नावावर दोन-दोन पीएफ खाती असण्याची समस्या दूर होईल आणि कोणत्याही सदस्याची सर्व पीएफ खाती एका खाते क्रमांकात विलीन होतील.

Paytm ची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना मात्र कोट्यवधींचा फायदा

EPFO ने निर्णय घेतला आहे की ते अॅडव्हाइजरी बॉडी फाइनान्स इनवेस्टमेंट अँड ऑडिट कमिटी (FIAC) अधिक शक्तिशाली बनवेल. EPFO ला वाटतं की FIAC ने केस-टू-केस आधारावर स्वतःच्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी सक्षम असावे. केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) 229 वी बैठक कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात EPFO ​​ने 4 उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कंपनी व कर्मचाऱ्यांशिवाय शासनाचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

First published:

Tags: Epfo news, Money, PF Amount