मुंबई, 21 नोव्हेंबर : नोकरी करणाऱ्यांच्या पगाराचा काही भाग पीपीएफ खात्यात (PPF Account) जमा केला जातो. VPF आणि PPF नेहमी नोकरदार लोकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम मार्ग आहेत. नोकरी करणाऱ्यांना या दोन्ही पद्धतींमध्ये गुंतवणूक करून चांगल्या बचत पर्यायासह चांगल्या व्याजदराचा लाभ मिळतो. PPF फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. PPF आणि VPF बाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. या दोन्ही योजनांमध्ये नेमका फरक काय आहे हे आज समजून घेऊया.
PPF(Public Provident Fund)
वित्त मंत्रालयाच्या नॅशनल सेव्हिंग्स इन्स्टिट्यूटने 1968 मध्ये बचत साधन (Saving Intrument) म्हणून PPF सादर केले होते. PPF मध्ये, तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय तुम्ही एका वर्षात तुमच्या PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF खाते 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येते. सध्या तुम्हाला PPF अंतर्गत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सवलतीचा लाभ देखील मिळतो. PPF अंतर्गत मिळणारे व्याज पूर्णपणे कराच्या कक्षेबाहेर आहे.
Paytm ची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना मात्र कोट्यवधींचा फायदा
VPF (Voluntary Provident Fund)
PPF व्यतिरिक्त, तुम्ही स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच VPF अंतर्गत देखील गुंतवणूक करू शकता. केवळ EPFO सदस्यच VPF योजनेत त्यांचे पैसे गुंतवू शकतात. कोणताही नोकरदार कर्मचारी त्याच्या मूळ पगाराच्या 12 टक्क्यांहून अधिक रक्कम EPF अंतर्गत गुंतवू शकत नाही. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक करायची असेल तर ते VPF द्वारे करू शकतात. सध्या तुम्हाला VPF वर 12 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तुम्ही VPF मध्ये गुंतवणूक केली तरीही तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. PPF प्रमाणे, EEE दर्जाची सुविधा VPF मध्ये देखील उपलब्ध आहे. EEE स्थिती म्हणजे गुंतवणुकीची रक्कम, व्याजाची रक्कम आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, PPF