मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm ची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना मात्र कोट्यवधींचा फायदा

Paytm ची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना मात्र कोट्यवधींचा फायदा

पेटीएमच्या निराशाजनक मार्केट एन्ट्रीनंतरही बर्कशायरसह सेलिंग इन्वेस्टर्स त्यांच्या उरलेल्या होल्डिंग्सवर चांगला परतावा मिळवत आहेत. गुरुवारी पेटीएमची क्लोजिंग मार्केट कॅप 1.01 लाख कोटी रुपये होती.

पेटीएमच्या निराशाजनक मार्केट एन्ट्रीनंतरही बर्कशायरसह सेलिंग इन्वेस्टर्स त्यांच्या उरलेल्या होल्डिंग्सवर चांगला परतावा मिळवत आहेत. गुरुवारी पेटीएमची क्लोजिंग मार्केट कॅप 1.01 लाख कोटी रुपये होती.

पेटीएमच्या निराशाजनक मार्केट एन्ट्रीनंतरही बर्कशायरसह सेलिंग इन्वेस्टर्स त्यांच्या उरलेल्या होल्डिंग्सवर चांगला परतावा मिळवत आहेत. गुरुवारी पेटीएमची क्लोजिंग मार्केट कॅप 1.01 लाख कोटी रुपये होती.

मुंबई, 20 नोव्हेंबर : पेटीएमचा आयपीओ (Paytm IPO) शेअर बाजारात लिस्ट झाला आणि अनेक गुंतवणूकदार निराश झाले. पेटीएमसारख्या मोठ्या कंपनीच्या IPO मध्ये पैशांची गुंतवणूक करुन कमाईची संधी शोधणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण लिस्टिंगनंतर IPO शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता नफ्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहेत. मात्र दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) यांनी पेटीएमच्या IPO मधील 14 लाख शेअर्सच्या विक्रीवर 1.6 कोटी डॉलरचा नफा कमावला आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, फॉर्च्युन इंडियाने दिलेल्या अहवालात अशी माहिती आहे.

सप्टेंबर 2018 मध्ये, वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने (Berkshire Hathaway) Paytm ची मूळ कंपनी One97 Communications मध्ये 30 कोटी डॉलरची म्हणजे 2179 कोटींची गुंतवणूक केली होती. जे 2.6 टक्के 1.70 कोटी शेअर होते. हा करार BH इंटरनॅशनल होल्डिंग्सच्या माध्यमातून झाला होता आणि वॉरेन बफेट यांची भारतातील पहिली गुंतवणूक होती. IPO नंतर पेटीएमचा स्टॉक 27 टक्क्यांच्या घसरणीसह शेअर बाजारात लिस्ट झाला. 14 लाख शेअर्सच्या विक्रीनंतर, बर्कशायर हॅथवेकडे आता One97 कम्युनिकेशन्समध्ये 2.41 टक्के हिस्सा आहे.

NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर?

पेटीएमच्या निराशाजनक मार्केट एन्ट्रीनंतरही बर्कशायरसह सेलिंग इन्वेस्टर्स त्यांच्या उरलेल्या होल्डिंग्सवर चांगला परतावा मिळवत आहेत. गुरुवारी पेटीएमची क्लोजिंग मार्केट कॅप 1.01 लाख कोटी रुपये होती. या आधारावर, पेटीएममधील बर्कशायरचा सध्याचा 2.41 टक्के भागभांडवल अजूनही 2,443 कोटी रुपये (33 कोटी डॉलर) आहे, तर त्याची किंमत रुपये 1,999 कोटी (27.8 कोटी) आहे.

Cryptocurrency संदर्भात मोठी अपडेट, वाचा काय होणार भारतीय गुंतवणुकदारांवर परिणाम

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांचे मत आहे की, पेटीएमची शेअर बाजारातील निराशाजनक सुरुवात भविष्यात आगामी आयपीओवर परिणाम करू शकते. या वर्षाच्या शेवटी येणार्‍या MobiKwik आणि OYO सारख्या IPO ला पेटीएमच्या निराशाजनक शेअर बाजारातील एन्ट्रीचा फटका सहन करावा लागू शकतो. याचे कारण असे की पेटीएम शेअर्सचे हाय वॅल्यू आणि नफा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंतित झाले.

First published:

Tags: Money, Paytm