मुंबई, 05 ऑगस्ट: तुम्ही एलपीजी ग्राहक असाल तर दर महिन्याला होणारा हा खर्च तुम्ही काही प्रमाणात नक्कीच वाचवू शकता. पेटीएमकडून (Paytm) अशा विविध ऑफर्स ग्राहकांना दिल्या जातात. बुधवारी देखील पेटीएमने (Paytm LPG Cashback offer) अशाच एक कॅशबॅक आणि रिवॉर्ड ऑफरची घोषणा केली आहे. नवीन युजर्सना '3 पे 2700 कॅशबॅक ऑफर' (3 pe 2700 cashback offer) चा फायदा घेऊ शकतात. या ऑफरमध्ये सलग तीन महिन्यासाठी ग्राहकांना पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. सध्याच्या ग्राहकांना प्रत्येक बुकिंगवर 5000 पर्यंत निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील. टॉप ब्रँड्समधून गिफ्ट व्हाउचर आणि काही खास डील्स मिळवण्यासाठी हे कॅशबॅक पॉइंट्स रीडीम केले जाऊ शकतात.
3 पे 2700 कॅशबॅक ऑफर योजनेचा फायदा युजर्सना तेव्हाच मिळेल जेव्हा ते एचपी (HP Gas), इंडेन (Indane) आणि भारत गॅस (Bharat Gas) मधून बुकिंग करणं आवश्यक आहे.
हे वाचा-करदात्यांना दिलासा! CBDT ने वाढवली ITR इलेक्ट्रॉनिक फायलिंगची डेडलाइन
या कॅशबॅक आणि कॅशबॅक पॉइंट्सच्या ऑफरसह ग्राहकांना आणखी एक ऑफर दिली जात आहे. ती म्हणजे ग्राहक आता गॅस बुक करुन पुढील महिन्यात त्यासाठीचे पेमेंट करू शकतात. पेटीएमने अलीकडेच काही नवीन फीचर्स जोडून ग्राहकांचा सिलेंडर बुकिंगचा अनुभव आणखी चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पेटीएमने युजर्सना सिलेंडरची डिलिव्हरी ट्रॅक करण्याचा देखील पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय फोनमध्ये सिलेंडर भरण्याचा रिमाइंडर देखील उपलब्ध करुन दिला आहे.
हे वाचा-नाशिकमधील बँकेसह 2 बँकांवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला 50 लाखांपेक्षा जास्त दंड
पेटीएमने (Paytm) ने गेल्यावर्षी 'बुक ए सिलेंडर' (book a Cylinder) ची सेवा सुरू केली होती. यासाठी कंपनीसह सुरुवातीला केवळ एचपी पेटीएमसह होती. आता पेटीएमसह इंडियन ऑइल आणि भारत गॅस देखील जोडले गेले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या सेवेचा फायदा मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price, Money, Paytm, Paytm Money, Paytm offers