मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ITR Filing: करदात्यांना दिलासा! CBDT ने वाढवली Income Tax Return ची इलेक्ट्रॉनिक फायलिंग डेडलाइन, ही आहे तारीख

ITR Filing: करदात्यांना दिलासा! CBDT ने वाढवली Income Tax Return ची इलेक्ट्रॉनिक फायलिंग डेडलाइन, ही आहे तारीख

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर विवरणपत्रं (Income Tax Return) इलेक्ट्रॉनिक भरण्याची मुदत वाढवली आहे. या संदर्भात सीबीडीटीने मंगळवारी एक परिपत्रक जारी केलं. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की करदाते आता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत फॉर्म 15 सीसी भरू शकतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून इन्कम टॅक्स फॉर्मच्या इलेक्ट्रॉनिक फायलिंगमध्ये काही अडचणी येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सीबीडीटीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर विवरणपत्रं (Income Tax Return) इलेक्ट्रॉनिक भरण्याची मुदत वाढवली आहे. या संदर्भात सीबीडीटीने मंगळवारी एक परिपत्रक जारी केलं. CBDT ने आयकर कायदा, 1961 अंतर्गत काही फॉर्म्स भरण्याची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.

काय आहे डेडलाइन?

incometax.gov.in या पोर्टलवर करदात्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहेत. सीबीडीटीने मंगळवारी एका परिपत्रकाद्वारे अशी माहिती दिली आहे की आता फॉर्म 15CC 31 ऑगस्टपर्यंत दाखल करता येईल. याआधी असा निर्णय घेण्यात आला होता की, करदाते ऑथोराइझ्ड डीलर्सना मॅन्युअल फॉरमॅटमध्ये 15CA/15CB 15 ऑगस्टपर्यंत सबमिट करू शकतील. हे फॉर्म इन्कम टॅक्स कायदा 1961 नुसार इलेक्ट्रॉनिक स्वरुपात फाइल करावे लागतात. आता सीबीडीटीने दिलेल्या माहितनुसार तुम्ही हे फॉर्म 31 ऑगस्ट 2021 पर्यंत फाइल करू शकता.

हे वाचा-Aadhaar Card असल्यास मोदी सरकार देतंय 1% व्याज दरानं कर्ज? इथे वाचा सविस्तर

सध्या करदात्यांना 15CA सह 15CB मध्ये चार्टेट अकाउंटंट सर्टिफिकेट ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड करावं लागतं. ज्यानंतर कॉपी अधिकृत डीलरकडे जमा करावी लागते. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म नंबर 1 मध्ये इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट देखील 30 जून 2021 पर्यंत जमा करायचे होते, त्याची तारीख वाढवून 31 ऑगस्ट 2021 करण्यात आली आहे. याशिवाय काही अन्य फॉर्म भरण्याची डेडलाइनही वाढवण्यात आली आहे. फॉर्म II SWF देखील आता 30 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे, आधी हा फॉर्म दाखल करण्याची तारीख 31 जुलै होती.

हे वाचा-Digital Payment प्लॅटफॉर्म e-RUPI लाँच, जाणून घ्या कसा आणि कुठे करता येणार वापर

इन्कम टॅक्सचे नवीन पोर्टल लाँच झाल्यानंतर करदात्यांना त्यामधील काही त्रुटींमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन पोर्टलमध्ये टॅक्स फायलिंगची समस्या येत आहे. परिणामी आयटीआर फायलिंगमध्ये उशीर होत आहे.

First published:

Tags: Income tax