मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paytm IPO : पेटीएम 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान 18300 कोटींचा आयपीओ आणणार, वाचा सविस्तर

Paytm IPO : पेटीएम 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान 18300 कोटींचा आयपीओ आणणार, वाचा सविस्तर

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने त्याचा IPO साईज 16,600 कोटींवरून 18,300 कोटी केला आहे.

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने त्याचा IPO साईज 16,600 कोटींवरून 18,300 कोटी केला आहे.

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने त्याचा IPO साईज 16,600 कोटींवरून 18,300 कोटी केला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 27 ऑक्टोबर : देशातील आयपीओ मार्केट सध्या तेजीत आहे. एकामागून एक, अनेक कंपन्या त्यांचे IPO आणत आहेत. डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्विस कंपनी पेटीएम (Paytm) भारतीय कॅपिटल मार्केटमधील सर्वात मोठा IPO आणत आहे. येत्या 8 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेटीएमचा आय लॉन्च केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी मनी कंट्रोलला दिली आहे.

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने त्याचा IPO साईज 16,600 कोटींवरून 18,300 कोटी केला आहे. सूत्रांनी सांगितले की, रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स रजिस्ट्रार ऑफ कंपनीज् (RoC) कडे दाखल करण्यात आले आहेत आणि ते 8-10 नोव्हेंबर दरम्यान लॉन्च करण्याची योजना आहे. दुसर्‍या सूत्रांनी सांगितले की 3 नोव्हेंबर रोजी अँकर प्लेसमेंट केले जाऊ शकते. पेटीएमच्या या मेगा ऑफरबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Diwali Muhurat Trading 2021: दिवाळीत 'या' खास वेळेत शेअर बाजारातून पैसे कमावण्याची संधी

SEBI कडे दाखल केलेल्या DRHP नुसार, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमन सॅक्स, अॅक्सिस कॅपिटल, ICICI सिक्युरिटीज, JP मॉर्गन, Citi आणि HDFC बँक या IPO साठी गुंतवणूक बँकर म्हणून काम करत आहेत.

JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची

भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

पेटीएमचा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर होता. कोल इंडियाने एका दशकापूर्वी आपल्या आयपीओमधून सुमारे 15,000 कोटी रुपये उभारले होते. विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये One97 ची सुरुवात केली. सुरुवातीला कंपनी वॅल्यू अॅडेड सर्विस प्रोव्हाडर म्हमून सुरू झाली. नंतर ती ऑनलाईन मोबाईल पेमेंट फर्ममध्ये डेव्हलप झाली.

First published:

Tags: Money, Paytm, Share market