मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमी पगारामुळे लग्नासाठी मुलींनी दिला होता नकार; Paytm कंपनी स्थापन करुन झाला अब्जाधीश

कमी पगारामुळे लग्नासाठी मुलींनी दिला होता नकार; Paytm कंपनी स्थापन करुन झाला अब्जाधीश

Vijay Shekhar Sharma Success story : Paytm कंपनी 18 हजार 300 कोटी रुपयांच्या देशातल्या सर्वांत मोठ्या आयपीओमुळे (IPO) चर्चेत आली आहे. मात्र, कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांना कमी पगार असल्याने अनेक मुलींना लग्न करण्यास नकार दिला होता. त्यांनीच ही गोष्टी सांगितली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 18 नोव्हेंबर : पेटीएम ही देशातली प्रसिद्ध डिजिटल पेमेंट कंपनी (Digital Payment Company) चालवणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड या फिनटेक स्टार्टअप कंपनीचा शेअर आज (18 नोव्हेंबर) शेअर बाजारात नोंदणीकृत झाला. गेल्या काही महिन्यांपासून ही कंपनी 18 हजार 300 कोटी रुपयांच्या आणि देशातल्या सर्वांत मोठ्या आयपीओमुळे (IPO) चर्चेत आहे. परिणामी कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) देखील बातम्यांमध्ये झळकत आहेत. शेअरलिस्टिंग सोहळ्यादरम्यान विजय शेखर शर्मा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत ते इथपर्यंत पोहोचले असल्यानं त्याक्षणी त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले. आज शर्मा अब्जाधीश असले तरी कधीकाळी त्यांना कमी पगारामुळे वधू मिळत नव्हती. विजय शेखर शर्मा यांच्या वाटचालीविषयीचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे.

पेटीएमचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांची वाटचाल प्रतिकूल परिस्थितीतून झाली. देशातली सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) एका छोट्या शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी होती. 2017 मध्ये ते भारतातले सर्वांत तरुण अब्जाधीश बनले; मात्र आजही त्यांना रस्त्याच्या कडेला उभं राहून चहा पिणं आवडतं. तसंच दररोज सकाळी दूधखरेदी करण्यासाठीही ते स्वतः जातात.

Paytm IPO: एका झटक्यात पेटीएमचे कर्मचारी मालामाल; 350 जणं होणार कोट्यधीश

43 वर्षांच्या विजय शेखर शर्मा यांनी 2010 मध्ये पेटीएमची स्थापना केली; मात्र त्यापूर्वी 2004-05 साली वडिलांनी कंपनी बंद करून महिन्याला किमान 30,000 रुपये पगार मिळेल, अशी नोकरी करण्याचा सल्ला आपल्याला दिला होता, असं विजय शेखर शर्मा यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं. आज 2.4 अब्ज डॉलर निव्वळ संपत्ती (Net worth) असलेले विजय शेखर शर्मा वयाच्या 27 व्या वर्षी महिन्याला केवळ 10 हजार रुपये कमावत होते. कमी मासिक उत्पन्नामुळे त्यांना विवाहासाठी वधूदेखील मिळत नव्हती. 'मी महिन्याला केवळ 10 हजार रुपये कमावतो हे कळल्यावर संभाव्य वधूंच्या कुटुंबीयांनी आम्हाला परत कॉलदेखील केला नाही. त्यामुळे माझ्यावर विवाहासाठी अयोग्य असल्याचा शिक्का बसला,' अशी कटू आठवण शर्मा यांनी सांगितली.

Good news: आता Paytm देणार 50 कोटींचा कॅशबॅक, वाचा का घेण्यात आला हा निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?

विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं, 'माझ्यासारखी इंजिनिअर व्यक्ती एका छोट्या कंपनीच्या माध्यमातून मोबाइलच्या साहित्याची विक्री करत होती. 2015 मध्ये चीनमधल्या अँट ग्रुपने पहिल्यांदा पेटीएममध्ये गुंतवणूक केली. त्यावेळी अशी स्थिती होती, की मी नेमकं काय करतोय याची माहिती माझ्या आई-वडिलांनाही नव्हती. एके दिवशी माझ्या आईने माझ्या नेटवर्थविषयी वृत्तपत्रात बातमी वाचली आणि तिनं मला विचारलं, की खरंच तुझ्याकडे एवढे पैसे आहेत?'

विजय शेखर शर्मा यांच्या पेटीएम कंपनीचा बोलबाला आधीपासूनच आहे. त्यात आता शेअर बाजारातल्या लिस्टिंगमुळे त्याबद्दलच्या चर्चेत आणखी वाढ झाली.

खेडेगावातल्या तरुणाला इंग्रजीही येत नव्हतं; असा उभारला Paytm चा डोलारा आणि झाला अब्जाधीश

पेटीएमच्या मदतीने एका क्लिकवर होतायेत कामं

पेटीएमच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला पेटीएमच्या मदतीने फक्त मोबाइल रिचार्ज केले जात होते, त्यानंतर त्याची सेवा खूप वेगाने विस्तारली. आता पेटीएम अॅपच्या मदतीने रेल्वे तिकीट, विमान तिकीट, विमा, सोने, चित्रपटाची तिकिटे, युटिलिटी बिले, बँक ठेवी, पैसे पाठवणे यासह डझनभर कामे केली जात आहेत. बर्कशायर हॅथवे आणि सॉफ्ट बँक सारख्या जागतिक गुंतवणूकदारांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

First published: