मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खेडेगावातल्या तरुणाला इंग्रजीही येत नव्हतं; असा उभारला Paytm चा डोलारा आणि झाला अब्जाधीश

खेडेगावातल्या तरुणाला इंग्रजीही येत नव्हतं; असा उभारला Paytm चा डोलारा आणि झाला अब्जाधीश

Vijay Shekhar Sharma Success : Paytm संस्थापक विजय शेखर शर्मा देशातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. मात्र, 27 वर्षांचे असताना ते 10 हजारांची नोकरी करत होते. सर्वसाधारण व्यक्ती ते अब्जाधीश हा प्रवास सोप्पा नव्हता. ते म्हणतात..

Vijay Shekhar Sharma Success : Paytm संस्थापक विजय शेखर शर्मा देशातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. मात्र, 27 वर्षांचे असताना ते 10 हजारांची नोकरी करत होते. सर्वसाधारण व्यक्ती ते अब्जाधीश हा प्रवास सोप्पा नव्हता. ते म्हणतात..

Vijay Shekhar Sharma Success : Paytm संस्थापक विजय शेखर शर्मा देशातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. मात्र, 27 वर्षांचे असताना ते 10 हजारांची नोकरी करत होते. सर्वसाधारण व्यक्ती ते अब्जाधीश हा प्रवास सोप्पा नव्हता. ते म्हणतात..

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 18 नोव्हेंबर : Paytm Founder Vijay Shekhar Sharma Success : Online Payment ची सुविधा देणाऱ्या Paytm कंपनीच्या इतिहासात आजचा दिवस विशेष आहे. आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO म्हणून Paytm IPO बाजारात लिस्ट झाला आहे. 18 हजार 300 कोटी रुपयांचा पेटीएम आयपीओ डिस्काऊंटसह बाजारात सूचीबद्ध झालाय. लिस्टिंगच्या निमित्ताने कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा खूप भावूक झालेला पहायला मिळाले. विजय शेखर शर्मा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी ते 10 हजार रुपयांची नोकरी करत होते, ज्यामुळे त्यांचं लग्नही होत नव्हते. मात्र, आज विजय भारतातील अब्जाधीश स्टार झाले आहे. एक सर्वसाधारण व्यक्ती ते बिलिनेयर विजय शेखर शर्मा हा प्रवास नेमका कसा होता? चला जाणून घेऊया.

रॉयटर्सशी बोलताना विजय शेखर शर्मा म्हणाले की, जेव्हा मी 27 वर्षांचा होतो तेव्हा मी 10 हजार रुपयांची नोकरी करत होतो. 2004-05 मध्ये माझे वडील म्हणाले की तू तुझी कंपनी बंद करून नोकरी कर. तुला 30 हजार रुपये जरी मिळाले तरी खूप आहेत. पेटीएमची स्थापना शर्मा यांनी 2010 मध्ये केली होती. आपल्या संघर्षाबाबत शर्मा म्हणाले की, त्यावेळी माझं स्टेटस इतकं कमकुवत होतं की मी लग्न करत नव्हतो. मी महिन्याला फक्त 10 हजार रुपये कमवत होतो. त्यामुळे मी माझ्या कुटुंबात पात्र नसलेला बॅचलर झालो होते.

2017 मध्ये भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश

शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी आहे. पेटीएमच्या यशानंतर 2017 मध्ये तो भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश बनला. पेटीएमच्या प्रवासाबाबत ते म्हणाले की, माझ्या कुटुंबाला अनेक वर्षे मी काय करतोय हेच कळाले नव्हते. 2015 मध्ये चीनच्या अँट ग्रुपने या कंपनीत पहिल्यांदा गुंतवणूक केली.

Paytm IPO: एका झटक्यात पेटीएमचे कर्मचारी मालामाल; 350 जणं होणार कोट्यधीश

इंग्रजीच्या नावाने भोपळा होतो

वयाच्या 14 वर्षीच त्यांनी 12वी उत्तीर्ण केली, ही एक विशेष गोष्ट होती. त्यांचे वडील शाळेतील शिक्षक आणि आदर्शवादी व्यक्ती होते. अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी ते शिकवणी घेत असे. ते छोटे शहर सोडून दिल्लीत आले आणि इथं त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

इंग्रजीच्या नावाने भोपळा असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे शालेय शिक्षण अलीगढमध्येच हिंदीमध्ये पूर्ण झाले. पुस्तके, जुनी मासिके आणि मित्रांच्या मदतीने तो इंग्रजी शिकू लागला. तो इतकी चांगला इंग्रजी शिकला की त्याच्यासोबत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाच इतकी इंग्रजी येत होती. त्यासाठी ते एकाच पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्या एकत्र वाचत असत.

Paytm IPO : पेटीएम 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान 18300 कोटींचा आयपीओ आणणार, वाचा सविस्तर

मात्र, त्यासाठी वेळ लागला. वर्गात नेहमी अव्वल असणारे शर्मा इतरांपेक्षा मागे पडू लागले. एका क्षणी तो इतका अस्वस्थ झाला की त्याने कॉलेजला जाणे बंद केले. कॉलेजच्या या वेळेचा उपयोग त्यांनी उद्योजक होण्यासाठी केला. त्याला स्टॅनफोर्ड विद्यापीठात जायचे होते, परंतु आर्थिक संसाधनांच्या अभावामुळे आणि इंग्रजीतील आव्हानांमुळे ते शक्य झाले नाही. तो स्वतः कोड करायला शिकला. आपल्या कॉलेज मित्रांसोबत त्यांनी कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली. काही मोठ्या वृत्तपत्रांनी त्याचा वापर सुरू केला. यावेळी त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत पहिली नोकरीही सुरू केली. मात्र, सहा महिन्यांनी त्यांनी ती नोकरी सोडली आणि मित्रांसोबत स्वतःची कंपनी स्थापन केली.

श्रीमंताच्या यादीत माझं नाव वाचून आईला धक्का!

यावेळी त्यांनी एक रंजक प्रसंग सांगितला, शर्मा म्हणाले की, माझी आई एकदा पेपर वाचत होती आणि त्यात माझ्याबद्दल काहीतरी लिहिले होते. तिने मला विचारले की तुझ्याकडे खरच इतके पैसे आहेत का जे सांगितले जात आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, विजय शेखर शर्मा यांची एकूण संपत्ती 2.4 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 20 हजार कोटी रुपये आहे.

Good news: आता Paytm देणार 50 कोटींचा कॅशबॅक, वाचा का घेण्यात आला हा निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?

पेटीएमच्या मदतीने एका क्लिकवर होतायेत कामं

पेटीएमच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला पेटीएमच्या मदतीने फक्त मोबाइल रिचार्ज केले जात होते, त्यानंतर त्याची सेवा खूप वेगाने विस्तारली. आता पेटीएम अॅपच्या मदतीने रेल्वे तिकीट, विमान तिकीट, विमा, सोने, चित्रपटाची तिकिटे, युटिलिटी बिले, बँक ठेवी, पैसे पाठवणे यासह डझनभर कामे केली जात आहेत. बर्कशायर हॅथवे आणि सॉफ्ट बँक सारख्या जागतिक गुंतवणूकदारांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

First published:

Tags: Paytm, Paytm Money, Startup Success Story