जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! घरभाडं भरणाऱ्यांसाठी Paytm ची खास ऑफर, मिळेल 10000 रुपयांपर्यंतचा फायदा

खूशखबर! घरभाडं भरणाऱ्यांसाठी Paytm ची खास ऑफर, मिळेल 10000 रुपयांपर्यंतचा फायदा

खूशखबर! घरभाडं भरणाऱ्यांसाठी Paytm ची खास ऑफर, मिळेल 10000 रुपयांपर्यंतचा फायदा

जर तुम्ही दरमहा तुमच्या घराचं किंवा दुकानाचं भाडं (House rent) भरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. देशातील सर्वात मोठी E-Wallet कंपनी असणारी Paytm कडून ही ऑफर दिली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 जून: जर तुम्ही दरमहा तुमच्या घराचं किंवा दुकानाचं भाडं (House rent) भरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. देशातील सर्वात मोठी E-Wallet कंपनी असणाऱ्या पेटीएम (Paytm) कडून ही ऑफर दिली जात आहे. तुम्ही जर तुमचं घरभाडं किंवा दुकानाचं भाडं पेटीएमच्या माध्यमातून भरत असाल तर तुम्हाला 10000 रुपयांपर्यंतचा फायदा होईल. पेटीएम दरवेळी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणि फीचर्स घेऊन येत असतं. आता कंपनीने आणखी एक फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध केली आहे. पेटीएमच्या रेंट पेमेंट फीचरच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार्डवरून थेट घरभाडं मालकाच्या खात्यात ट्रान्सफर करू शकता आणि यावर तुम्हाला 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळेल. वाचा काय आहे ऑफर? जर एखाद्या युजरने पेटीएमवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रेंटचे पैसे भरले तर त्याला 10000 रुपयांपर्यंतचा सुनिश्चित कॅशबॅक (Paytm Cashback) मिळेल. याशिवाय नवीन आणि सध्याच्या युजर्सना पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर त्यांना क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून देखील बक्षीस मिळू शकेल. हे पेमेंट तुम्हाला लाभार्थ्याच्या बँक खात्यावर किंवा यूपीआय आयडीवर करावं लागेल आणि पेटीएम यूपीआय, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करता येईळ. कंपनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी एक टक्क्यांचे किमान शूल्क आकारते. हे वाचा- Gold Price Today: खूशखबर! रेकॉर्ड स्तरावरुन 7000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं Paytm चं नवं फीचर पेटीएमने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काही काळापूर्वी हे फीचर जोडले आहे. याअंतर्गत युजर्सना अगदी सोप्या पद्धतीने घरभाडं किंवा दुकानाचं भाडं भरता येतं. युजर्सनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भाडं भरलं तर त्यांच्या घरमालकाच्या बँक खात्यात थेट पैसे पोहोचतील. त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून क्रेडिट कार्डद्वारे जर पेमेंट केले तर त्यांना 1 टक्का अतिरिक्त शूल्क द्यावे लागेल. युजर्सना याकरता कॅशबॅक किंवा रिवॉर्ड्स दिले जातील. हे वाचा- नोकरदारांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार तुमचा PF, वाचा काय आहे सरकारचा प्लॅन वाचा कसं कराल पेमेंट Paytm App वर जाऊन शो मोअरवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला रिचार्ज आणि पेमेंट या टॅबवर जावं लागेल. याठिकाणी तुम्हाला रेंट भरण्यासाठी असणाऱ्या पर्यायावर क्लिक करावं लागेल, यानंतर पेमेंटचा पर्याय दिसेल. याठिकाणी तुम्ही आधी केलेलं पेमेंट ट्रॅक देखील करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात